पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकून खून, लूटमार करणारी कोयता गॅंग LCB कडून जेरबंद, खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचाही केला होता दृश्यम स्टाइल खून



पुणे : सहकारनामा

आज दि ४/१/२०२१ रोजी  लोणी काळभोर बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर दि २८/१२/२०२० रोजी रात्री २ ते ३ च्या दरम्यान अज्ञात 5 इसमानी धारधार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन पेट्रोल पंपा वरील काम करणाऱ्या कामगारांना मारून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी दरोडा टाकला होता.

त्या बाबत लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गु र नं ९६१/२०२०  भा द वी कायदा कलम ३९४,३४, ४२७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.  सदरच्या दरोड्यात २५००/-रु रोख रक्कम आणि ३७०००/-रु किमतीचे २ मोबाईल असा एकूण  ३९५००/-  रू चा माल चोरून नेला होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास  स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करीत होते सदरच्या गुन्ह्यातील तपास करीत असताना cc tv फुटेज वरून आरोपींचा माग काढला सदरचे आरोपी हे रांजणगाव गणपती या गावात असल्याचे समजलेवरून  रांजणगाव राजमुद्रा चौकात संशयित 5 इसम मोटार सायकल वर येत असल्याचे समजलेवरून त्या ठिकाणी सापळा रचून खलील ५ इसमाना ताब्यात घेतले.

१) किरण भाऊसाहेब थिटे  (वय २१ वर्षे रा केंदूर ता. शिरूर जि पुणे)

२) गौरव बाळू ढवळे (वय २१वर्षे रा खोप वस्ती , अष्टापुर ता हवेली जि पुणे)

३) संतोष गोरख ब्राम्हणे (वय २० वर्षे रा शनिशिंगणापूर, ता नेवासा जि अहमदनगर) ४) भाऊसाहेब गौतम कुडुक
(वय २२ वर्षे रा शेकटा ,जिल्हा परिषद शाळे जवळ ता गेवराई जि बीड) ५) दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट वय २१ वर्षे रा उंब्रज , दांगट पट ता जुन्नर जि पुणे  सर्वजण हल्ली रांजणगाव गणपती  तालुका शिरूर जिल्हा पुणे वरील संशयित यांच्याकडे कसून चौकशी केली असता लोणी काळभोर येथील  पेट्रोलपंप वर दरोडा टाकल्याचे सांगितले आहे वरील ५ जणांची  आणखीन कसून चौकशी केली असता दि.०२/०१/२०२१ रोजी रांजणगाव  येथे वरील इसमानी बाहेर फिरायला जान्यासाठी रांजणगाव येथिल टुरिस्टचा व्यवसाय करणारे चालक नामे योगेश मचिंद्र गर्जे (वय २५  वर्षे रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे) याची स्विफ्ट डिझायर गाडी बोलावून घेतली  त्यानंतर आरोपी यांनी गाडीत बसून पुढे वणी गढ येथे  फिरायला जाण्यासाठी  सोनेसांगवी ते मलठण रोड ला गाडी नेली त्यानंतर गाडी तील  आरोपी यांनी गाडी चालक यांना लघवीचे नाटक करून गाडी थांबवून ती गाडी चोरी करण्याचा  प्रयत्न केला . सदरील गाडी वरील  चालक  योगेश याने त्यास विरोध केला , विरोध रोखण्यासाठी सदरच्या आरोपीनी त्यास कोयता तसेच दगडाने मारण्यास सुरवात केली पुढे त्याच्या तोंडावर कोयत्याने तसेच दगडाने ठेचून खून केला असल्याचे समोर आले. सदरील खुनाचा तपास लागू नये म्हणून वरील आरोपी यांनी  योगेश याचे प्रेत हे गाडीच्या डिकी मध्ये ठेऊन गाडी ही भवरापूर ता हवेली येथील मुळामुठा नदी वरील पुलावर आणून पुलावरून योगेश याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचा हेतूने नदीचे पाण्यात फेकून दिले असल्याचे वरील  आरोपी सांगत आहे सदरच्या गुन्ह्या बाबत योगेश मचिंद्र गर्जे वय २५ वर्षे रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे ही व्यक्ती गेले २ दिवसापासून हरवली असल्याची तक्रार दि ३/१/२०२१ रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मानव मिसिंग रजिस्टर २/२०२१ अन्वये नोंद केलेली आहे. सदरचे दोन्ही गुन्हे आरोपी यांनी केले असल्याचे सांगितल्याने पुढील तपास कामी आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ  अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली , पो उप नि शिवाजी, ननावरे, सहा फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना राजू मोमिन

पो ना जनार्दन शेळके, पो ना विजय कांचन

पो ना मंगेश थिगळे, पो कॉ धिरज जाधव ,

अक्षय नवले समाधान नाईकनवरे यांनी केली आहे.