मिल्ट्री कॅन्टीन मधील विदेशी दारू गुजरातला विक्रीसाठी नेणारा इसम LCB ने केला जेरबंद



पुणे : सहकारनामा 

दि. 1 फेब्रुवारी रोजी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामशेत परीसरात पेट्रोलिंग करीत असताना  मयुर उघाडे (रा. लाणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे) हा इसम कामशेत ता. मावळ जि पुणे येथे एक्सप्रेस हायवेवरुन ट्रॅव्हल्स द्वारे पुणे ते  गुजरात येथे अवैध विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी कामशेत बोगद्याजवळ एक्सप्रेस हायवेवर ट्रॅप लावून त्यास ताब्यात घेतले असता त्याचे कब्जात २४५०८ / – रुपयाचा प्रोहीबीशनचा माल मिळून आला सदर इसम व  प्रोव्ही. माल पंचनाम्याने जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी कामशेत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, पो हवा प्रकाश वाघमारे, पो हवा सुनील जावळे, पो हवा महेश गायकवाड, पो हवा निलेश कदम, पो हवा गुरू गायकवाड, पो हवा सुभाष राऊत 

पो.कॉ.अक्षय नवले, पो.कॉ. प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.