वीज ट्रान्सफार्मचे सुटे भाग चोरणारी टोळी यवत पोलीस आणि LCB शाखेकडून जेरबंद, चोरलेला मुद्देमाल हस्तगत



पुणे : सहकारनामा

दिनांक ०४/०३/२०२१ रोजी रात्रौ.०१.३८ वा.चे सुमारास यवत (दोरगेवाडी ता.

दौंड जि.पुणे) गावचे हददीतील वैष्णव इलेक्ट्रिकल कंपनीचे मोकळया जागेतील असणाऱ्या आवारात पत्र्याचे शेड उचकटून त्यामधील तांब्याच्या जुन्या तारा तसेच नवीन तांब्याच्या तारा व नवीन तांब्याची पटटी असा एकुण १२,००,२८८/- रू.चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करून नेल्याने यवत पोलीस स्टेशनला गु.र.नं. १९६/२०२१ भा.दं.वि.काक.४६१,३८०,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास यवत पोलीस स्टेशन

व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी संयुक्तरित्या करत असताना त्यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांचे आधारे मिळालेल्या  माहितीवरून हडपसर व पुणे शहरात इसम  दीपक पांडुरंग खिल्लारे (वय ३१ वर्षे रा. भिमनगर बी.जी.शिर्के कंपनीजवळ मुंढवा पुणे ३६) दिपक काळा सुतार

(वय ३१ वर्षे रा.तरोडेवस्ती महमंदवाडी रोड तरोडेवस्ती पोलीस चौकीचे पाठीमागे पुणे) अरविंद रोहीदास वाघमारे (वय ३० वर्षे रा.सन्हें नं.१२४/२८३ बी.जी शिर्के कंपनीजवळ मुंढवा पुणे ३६)  विजय पोपट शेंडगे (वय २८ वर्षे रा.तरोडेवस्ती महमंदवाडी रोड तरोडेवस्ती पोलीस चौकीचे पाठीमागे पुणे) यांनी केला असल्याची माहिती मिळाली.

सदर पथकाने संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले पिकअप वाहनाचा वापर केल्याचे सांगुन त्या पिकअप गाडीमध्येच चोरीचा माल असल्याचे सांगितल्याने ती पिकअप जप्त करण्यात आली.त्यावेळी गुन्हयात चोरीला गेलेल्या मालापैकी ६१० किलो तांब्याच्या तारा व पटटी असा एकुण ४,२७,०००/-रू.चा माल जप्त करण्यात आला. यातील आरोपी नं.१ याचेवर यापुर्वी हडपसर व लोणीकाळभोर येथे दरोडा व इतर गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस

अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, दशरथ बनसोडे, संतोष पंडीत, बाळासाहेब चोरमले, धीरज जाधव, पोलीस नाईक राजु मोमिन, विजय कांचन यांनी केलेली आहे. 

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले हे करीत आहेत.