Categories: Previos News

पुणे ग्रामिण LCB ने पाठलाग करून चंदन तस्करांना पकडले, 25 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ने चंदन तस्करांना पाठलाग करून पकडले असून त्यांच्याकडून सुमारे 25 लाख 82 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर  घनवट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पुणे-नगर रोडवर अशोक लेलंड कंपनीचा एक टेम्पो क्र. एम एच 17 बी डी 2698 हा अहमदनगरच्या दिशेने जात असून त्यामधे चंदनाच्या झाडाची लाकडे  काहीजण अवैधरित्या घेऊन जात आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या पथकांना सूचना देत स्थानिक गुन्हे शाखेच्या  वाहनाने तिचा पाठलाग सुरु केला. 

सदर वाहन शिक्रापुर येथे चाकण चौकात आले असता त्याला थांबऊन चालकाकड़े चौकशी केली असता गाड़ी रिकामी असल्याचे त्याने सांगितले. परंतु गाडीची पूर्ण झड़ती घेतल्यानंतर गाड़ीच्या हौद्यामधे एक छुपा कप्पा जो कि दिसणार नाही अश्या पद्धतीने तयार केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर कप्पा उघडून पाहिला असता त्या मध्ये मोठ्या आकाराच्या गोन्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली.

चंदनाची लाकडे, गाभा मिळताच पोलिसांनी सूरज कैलास उबाळे (वय 24 रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमद नगर) यास ताब्यात घेतले. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मुद्देमालासह शिक्रापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वरील कारवाई हि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे, पोसई अमोल गोरे, सहा.फौ दत्तात्रय गिरमकर, पोना मंगेश थिगळे, पोशी अक्षय नवले, पोशी प्रसन्नजीत घाडगे यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

7 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago