वाखारी (दौंड) येथील जबरी चोरी करणारा सोन्या सूर्यवंशी आणि लखन देशमुख LCB कडून जेरबंद, दोघांवर मिळून 25 गुन्हे दाखल



पुणे : सहकारनामा

दि.११/३/२०२१ रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी गांवचे हददीत कॅनॉलचे कच्चे रोडचे कडेला इसम नामे सागर उर्फ सोन्या सुर्यवंशी व एक अनोळखी इसम यांनी फिर्यादी रमेश शामजी कुछाडीया (वय ३६ वर्षे  रा.कोपरखैरणे, नवी मुंबई) यांचे गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन, उजवे मनगटावरील दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठया, एक मोबाईल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकुण किं.रु. १,४५,०००/- चा माल जबरदस्तीने काढून चोरून नेला होता. 

त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरड केला असता तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले होते. सदर घडले प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशनला गु.र.नं. २४१/२०२१ भादंवि क. ३९२,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

 सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना आज रोजी  LCB टिमला दोघे इसम पाटस, बारामती फाटा ता.दौड जि.पुणे येथे सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळालने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी १) सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी (वय २९ वर्षे रा.केडगाव पिसेवस्ती ता.दौंड जि.पुणे) २) अमोल उर्फ लखन विलास देशमुख (वय २९ वर्षे रा.खंडोबानगर ता.बारामती जि.पुणे) या दोघांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे वाखारी येथील जबरी चोरीचे गुन्हयातील चोरलेल्या २ सोन्याच्या अंगठया, १ मोबाईल, रोख रक्कम रू. ७०००/- तसेच गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व इतर १ मोबाइल असा एकूण १,०२,०००/- (एक लाख दोन हजारचा माल मिळून आलेने तो जप्त केलेला आहे. 

आरोपींनी दोघांनी मिळून सदर गुन्हा केल्याचे सांगितले आहे. आरोपी सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी ३ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

१) यवत पो.स्टे. गु.र.नं. ७३४/२०१९ भा.द.वि.३९२,३४

२) भिगवण पो.स्टे. गु.र.नं. ३३८/२०२० भा.द.वि.३९४,३४

३) यवत पो.स्टे. गु.र.नं. ७७३/२०२० भा.द.वि. ३९२,३४

आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी खालील प्रमाणे जबरी चोरी १, खंडणी १, पळवून नेणे १, दुखापत १, मोटर सायकल चोरी १९ असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत.

१) यवत पो.स्टे. गु.र.नं. २४४/१३ भादंवि क.३९२,३४ 

२) यवत पो.स्टे. गु.र.नं. २७६/२०१४ भादंवि क.३६४,३२३ 

३) बारामती शहर पो.स्टे. गु.र.नं. १७९/२०१७ भादंवि क.३८७, ३८५

४) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं. ३४६/२०१५ भादंवि क.३२४ 

५) शिक्रापूर पो.स्टे. गु.र.नं. ९५/२०१७ भादवि क.३७९ 

६) शिक्रापूर पो.स्टे. गु.र.नं. १५२/२०१७ भादंवि क.३७९ 

७) शिकापूर पो.स्टे. गु.र.नं. २१९/२०१७ भादंवि क.३७९

८) शिक्रापूर पो.स्टे. गु.र.नं. ३२५/२०१७ भादंवि क.३७९ 

९) शिकापूर पो.स्टे. गु.र.नं. ३७४/२०१७ भादंवि क.३७९ 

१०) शिक्रापूर पो.स्टे . गु.र.नं. ५१९/२०१७ भादंवि क.३७९ 

११) दौंड पो.स्टे. गु.र.नं. ३८२/२०१७ भादंवि क.३७९ 

१२)लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ३९५/२०१५ भादंवि क.३७९ 

१३)लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. २३१/२०१७ भादंवि क.३७९ 

१४)लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. ५२९/२०१७ भादंवि क.३७९ 

१५) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. ७५/२०१७ भादंवि क.३७९ 

१६) जेजूरी पो.स्टे . गु.र.नं. १८५/२०१७ भादंवि क. ३७९ 

१७)वानवडी पो.स्टे . ( पुणे शहर ) गु.र.नं. ४४०/२०१६ भादंवि क.३७९ 

१८) हडपसर पो.स्टे. ( पुणे शहर ) गु.र.नं .६७३/२०१७ भादंवि क.३७९ 

१९)चाकण पो.स्टे. गु.र.नं .६६७/२०७ भादंवि क.३७९ 

२०)फलटण तालुका ( सातारा ) पो.स्टे. गु.र.नं. १६८/२०१७ भादंवि क. ३७९

२१) अकलूज पो.स्टे. ( सोलापूर ) गु.र.नं. २९९ / २०१७ भादंवि क.३७९ 

२२) बारामती शहर पो.स्टे. गु.र.नं.३९४/२०१७ भादंवि क. ३७९, ३४

सदर दोन्ही आरोपी यांची वैदयकिय तपासणी करुन आरोपी व जप्त मुद्देमाल यवत पो.स्टे. चे ताब्यात दिलेला आहे. 

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, पोसई रामेश्वर धोंडगे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, यांनी केलेली आहे.