|सहकारनामा|
बारामती : बारामतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने थरारक पाठलाग करत दरोड्याचा गुन्हा असलेला ‛मोक्का’तील आरोपीस जेरबंद केले आहे.
दि.३०/११/२०२० रोजी ०१.०० वा.चे सुमारास मौजे म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीत आरोपी नामे १.बाळा पोपट दराडे २.विजय बाळू गोफणे ३.शुभम ओमप्रकाश खराडे व इतर २ अनोळखी आरोपी यांनी फिर्यादी संजय तुकाराम थोरवे (म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे) यांना बारामती शहर, बारामती तालुका व भिगवण या पोलीस स्टेशनला दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचे कारणावरून फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून आरोपी नं. १ ते ३ यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व गजाने फिर्यादीचे डोक्यावर, बरगडीवर व पायावर मारहाण करून उशीजवळ ठेवलेले घड्याळ व रोख रक्कम घेतली. तसेच फिर्यादीची पत्नी योगिता हिचा गळा दाबून तिच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून तिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी नं. ४ व ५ यांनी ‘संज्याला खल्लास करा, जिवंत सोडू नका’ असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाऊ येत असल्याचे पाहून आरोपी नं. १ बाळा दराडे याने त्याचे कमरेला असलेला पिस्टल काढून फिर्यादीचे डोक्याला लावून, ‘आज वाचला तर पुढच्यावेळी गोळ्या घालील.’ असे म्हणून पांढर्या चार चाकी गाडीत निघून गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिगवण पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४३०/२०२० भादंवि क.३९७,३०७,४५२,४२७, ५०६, ३४ आर्म ॲक्ट कलम ३,२५ अन्वये खुनाचा प्रयत्नासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तपासामध्ये सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) कलम लावण्यात आलेले होते. गुन्हयातील आरोपी नं १ व २ यांना यापूर्वी बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे. परंतु आरोपी नं.३ शुभम ओमप्रकाश खराडे (रा.शेटफळगडे ता.इंदापूर) हा सदर गुन्हयात फरार होता.
सदर गुन्हयातील फरारी आरोपी शुभम ओमप्रकाश खराडे रा.शेटफळगडे याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू होता. सदर आरोपी हा पोलीसांचे भितीने भिगवण व बारामती परिसरात घरी न राहता रानावनात ठिकाणे बदलून राहत होता. त्यामुळे तो पोलीसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.
आज रोजी सदर गुन्हयातील फरारी आरोपी पेन्सील चौक बारामती येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी वेशांतर करून सापळा रचून आरोपी शुभम ओमप्रकाश खराडे (वय २४ वर्षे रा.शेटफळगडे ता.इंदापूर जि.पुणे) यास पाठलाग करून जेरबंद केले आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खालील प्रमाणे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
१. भिगवण पो.स्टे. गु.र.नं. ४३०/२०२० भादंवि क.३९७,३०७, ४५२, ४२७, ५०६, ३४ आर्म ॲक्ट ३,२५ सह मोक्का
२. भिगवण पो.स्टे. गु.र.नं.३९१/२०२० भादंवि क.३५४,४५२ सह पोस्को
३. बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.३३७/२०१८ भादंवि क.३२४
४. बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.८६३/२०१९ भादंवि क.३८५,३८७
५.बारामती तालुका गु.र.नं.२५/२०२१ भादंवि क.३९४
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास पुढील कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो., बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,
स.पो.नि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,
पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.