पुणे : (सहकारनामा ऑनलाइन)
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका दुचाकीस्वार कामगारास चाकूचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती या घटनेतील चोरट्यांना जेरबंद करण्यास अखेर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
दि 12 नोव्हेंबर 2019 रोजी फिर्यादी अक्षय गजानन रणसिंग (वय 26 वर्षे, रा.निमगाव म्हाळुंगे ता.शिरूर जि.पुणे) हे रात्रीच्यावेळी त्यांची हिरो हेांडा मोटर सायकल नं. एम एच 14 ए पी 8426 यावरून कारेगाव गावचे हददीत शंकर नवले यांचे गोडावुनचे समोरील एम.आय.डी.सीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडने जात असताना चार अनोळखी इसमांनी फिर्यादीला आडवुन त्यांचेकडील मोटर सायकल , रोख रक्कम व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण 25,450/- रू.माल जबरी चोरी करून चोरून नेला होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी शैलेशकुमार रामतीर्थ चौरासीया (वय 22 वर्ष रा.सुबाखरपुरआंबेडरकनगर उत्तरप्रदेश) रामकृश्ण अंकुष पात्रे, (वय 36 वर्शे रा. बोती ता.गंगाखेड जि. परभणी) यांनी त्यांचे साथीदारांसह केला आहे. त्यानंतर नमूद आरोपी हे रांजणगाव एम.आय.डी.सी आणि न्हावरा येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय गुंड, सफौ. दत्तात्रेय गिरमकर, सफौ. दयानंद लीमन, पोना. एम.आय.मोमीन
पोना.जनार्दन शेळके,
पोना.दत्तात्रय तांबे
यांनी केली.