मावस बहिणीशी बोलतो म्हणून वकिलाच्या भावाचा बारामतीत सपासप वार करून खून

बारामती : मावस बहिणीशी बोलतो म्हणून बारामती येथील वकिलाच्या भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना 19/12/2024 रोजी रात्री 10:30 वाजता बारामतीच्या प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी कॉलेजकडे येणारे रोडवर घडली आहे. याबाबत अभिषेक सदाशिव गजाकस (व्यवसाय वकिल रा. देसाई ईस्टेट बारामती ता. बारामती जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

वकिलाच्या भावावर जीवघेणा हल्लाकरून ठार मारणाऱ्या आरोपी 1) नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगतीनगर ता बारामती जि पुणे) 2) महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे) 3) संग्राम खंडाळे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 19/12/2024 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी. कॉलेजकडे येणाऱ्या रोडवर फिर्यादी यांचा भाऊ अनिकेत हा नंदकिशोर अंभोरे याच्या मावस बहीनिशी बोलत असल्याचे कारणावरुन वरील आरोपिंनी मिळुन अनिकेत सदाशिव गजाकस यास गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक  गणेश बिरादार (बारामती) SDPO दडस दौंड, SDPO भटे ब-हानपुर, प्रभारी अधिकारी  विलास नाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा अधिक तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गजानन चेके हे करीत आहेत.