अब्बास शेख
दौंड : गर्भाशयासंबंधीचे आजार म्हटले की महिलांना हळू हळू मृत्यूच्या दाढेत ओढत घेऊन जाणारा जीवघेणा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. अनेकवेळा महिलांना वेळीच योग्य मार्गदर्शन आणि उपचार न मिळाल्याने महिलांच्या गर्भाशयाचे आजार बळावून त्याचे रूपांतर कॅन्सर सारख्या भयानक रोगात होते तर अनेक प्रकरणांमध्ये आजाराचे निदान होऊनही केवळ घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक महिला गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेपासून वंचित राहून त्यांना मृत्यूला कवटाळावे लागते. आता मात्र महिलांची या सर्व त्रासातून मुक्तता होणार अशी आशा निर्माण झाली असून महिलांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी केडगाव (ता.दौंड) येथील ‘लवंगरे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलने’ सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
लवंगरे मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी महिलांसाठी विशेष कॅम्प ठेवण्यात आला असून ज्यामध्ये महिलांच्या ‘गर्भाशयाची पिशवी काढण्याचे ऑपरेशन’ अवघ्या २९ हजार ९९९ रुपयांमध्ये अनुभवी एम.डी डिग्री प्राप्त सर्जन आणि गोल्ड मेडलीस्ट डॉ.आशिष काळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. गर्भाशयाची पिशवी काढणे (Lap-Hys) या ऑपरेशनसाठी पुण्यासारख्या ठिकाणी साधारण १ लाखाच्या आसपास सुरुवातीचा खर्च येतो आणि तेथे ॲडमिट राहून उपचार घेण्याचा खर्च हा वेगळाच होतो. लवंगरे हॉस्पिटल या ठिकाणी मात्र सकाळी ऑपरेशन झाले की संध्याकाळपर्यंत रुग्ण ठीकठाक होऊन आपल्या घरी जाऊ शकणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा गर्भाशया संबंधीचे आजार असणाऱ्या सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती लवंगरे यांनी नागरिकांना केले आहे.
लवंगरे हॉस्पिटल हे गेल्या २९ वर्षांपासून केडगाव परिसरातील एक नावाजलेले आणि विश्वसार्हता मिळवलेले हॉस्पिटल आहे आणि त्यांनीच महिलांसाठी ही खास संधी उपलब्ध करून दिली आहे. ही लक्षणे असणाऱ्या महिलांना हे ऑपरेशन गरजेचेच आहे – ज्या महिलांना खूप रक्तस्त्राव होतो. ज्या महिलांच्या गर्भाशयाच्या पिशवीला गाठी आहेत. ज्या महिलेला खोकल्यानंतर लघवी येते, योनीच्या भागात जळजळ होते, ज्यांच्या पिशवीला गाठी आल्या असतील किंवा ज्यांच्या पिशवीला कर्करोग म्हणजेच कॅन्सर झाला असेल अश्या महिलांच्या गर्भाशय पिशवीचे ऑपरेशन सुद्धा अवघ्या २९ हजार ९९९ रुपयांमध्येच करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिला गरीब आहेत, ज्यांचे पिवळे रेशनकार्ड आहे, ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड आहे त्यांचे ऑपरेशन तर मोफत करण्यात येणार असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती लवंगरे यांनी ‘सहकारनामा’ ला दिली आहे. ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 98197 31111 या नंबरवर संपर्क साधून त्वरित आपली नाव नोंदणी करायची आहे.
टीप – एका दिवसात (Lap-Hys) गर्भ पिशवी काढण्याचे
ऑपरेशन फक्त रु २९,९९९
सकाळी पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी घरी सोडण्यात येणार आहे…. हॉस्पिटलचा पत्ता :- लवंगरे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटल, पहिला मजला, महालक्ष्मी मंदिर शेजारी, केडगाव स्टेशन, ता. दौड, जि. पुणे (पूर्वनोंदणी आवश्यक) नाव नोंदणी संपर्क क्रं. +91 98197 31111