केडगाव (दौंड) : केडगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या उमेदवार वनिता मनोज उर्फ संताजी शेळके यांच्यामागे नागरिकांची सुप्त लाट उभी राहिली असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. थोरात गटाने हा दावा केला असून वनिता शेळके यांना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे नागरिकांचा कल परिवर्तन करण्याच्या दिशेने असल्याचे दिसत असल्याचा असा दावा थोरात गटाने केला आहे.
दहा वर्षे एकहाती सत्ता असूनही विकास नाही, मनमानी या प्रकाराला वैतागलेले नागरिक आता बदल करू इच्छित असल्याचे दिसत आहे. गेली दहा पंधरा वर्षे एकाच गटाची सत्ता केडगाव ग्रामपंचायतवर असून या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले असल्याचे सचिन लालासो शेळके यांनी म्हटले आहे. सरपंच कुणीही झाला तरी सत्ता मात्र ठराविक टोळीची राहते आणि त्यामुळे केडगावचा विकास खुंटत चालला असल्याचे यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले.
सौ. वनिता मनोज उर्फ संताजी शेळके यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला असून त्यांच्यामागे नागरिकांच्या पाठिंब्याची सुप्त लाट आहे. त्यामुळे केडगाव ग्रामपंचायतवर थोरात गटाची सत्ता येईल असा विश्वास धोंडिबा शेळके, भानुदास देशमुख, माऊली शेळके, राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केला. सांगता सभेला वरील मान्यवरांसह अजय कांबळे, दत्ता शेळके आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी सौ. वनिता मनोज उर्फ संताजी शेळके आणि त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सभेला केडगावमधील राजेंद्र मलभारे, माजी उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड, दत्ता निंबाळकर, धोंडिबा शेळके, भानुदास देशमुख, सचिन शेळके, सतीश शेळके पाटील, माऊली शेळके, राजेंद्र शेळके, शरद सोडनवर पाटील, दत्ता कडू, संतोष देशमुख, यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.