मुंबई : भारतरत्न, जगप्रसिद्ध गान गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. याबाबत ANI ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ट्वीटच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली होती.
काल त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्या पुन्हा उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली होती.
आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संपूर्ण देशावर दुःखाचे सावट पसरले आहे. लता मंगेशकर यांसारखी दुसरी गानकोकिळा होऊ शकत नाही अश्या शब्दांत अनेक राजकीय व्यक्ती दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
सध्या ब्रीचकँडी रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.