Categories: Previos News

Kurkumbh Mori – दौंड मधील ‛तिसऱ्या’ कुरकुंभ मोरीचे काम डिसेंबर महिन्या अखेर पूर्ण करणार, खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे अधिकाऱ्याचा शब्द



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी)

2014 साली ना. शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे काम विविध कारणांनी आज पर्यंत रेंगाळलेले आहे,  दि.17 जून रोजी या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्याने शब्द दिला आहे की सदरचे काम या वर्षीच्या डिसेंबर महिन्या अखेर आम्ही पूर्ण करून देवु. 

कायम चर्चेत राहिलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरी कामासाठी राज्य सरकारने 16 कोटी 50 लाख रुपये रेल्वे प्रशासनाला यापूर्वीच अदा केले आहेत. या कामाचे पूर्ण पैसे मिळाल्या शिवाय कामाला सुरुवात करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाला पूर्ण पैसे मिळाल्या नंतरही काम पूर्ण करण्यात आज पर्यंत अपयश आलेले आहे.4 मिटर उंच,4 मिटर रुंद व 35 मीटर लांबीचे दोन सिमेंट काँक्रीटचे बॉक्स या कामासाठी तयार करण्यात आले आहेत.

लोहमार्ग खाली पुशिंग तंत्रज्ञानाने हे बॉक्स बसविण्यात येणार आहेत. तब्बल 14 महिने झाले ठेकेदाराने बॉक्सचे काम पूर्ण केले आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून पुढील कामासाठी परवानगी न मिळाल्याने काम सध्या बंदच आहे. पावसाळ्यानंतर सदरचे काम सुरू करून येत्या डिसेंबर महिन्या पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना शब्द दिला आहे. 

शहरातील सुरू असलेल्या अष्टविनायक मार्ग रस्त्याच्या कामाची सुद्धा सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून हे रस्त्याचे काम चांगले व्हावे म्हणून सर्वांनीच मदत करणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याचे काम आराखड्यानुसार, योग्य मापातच( रुंद) व चांगल्या दर्जाचेच व्हायला पाहिजे असेही सुळे यावेळी म्हणाल्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी चौक या मार्गावरील रस्ता व्यापाऱ्यांचे हित जपत अरुंद केला जात आहे, या रस्ता कामात अडथळा ठरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या जागा न काढताच रस्त्याचे काम केले जात असल्याची बाब नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख यांनी सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिली. 

या मार्गावरील अडथळे न काढता जर रस्त्याचे काम होणार असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत होवु देणार नाही, ते बंद पाडले जाईल असा इशारा बादशहा शेख यांनी दिला आहे. यावेळी मा. आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, वीरधवल जगदाळे तसेच पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago