‘कुल’ बोलले, दल हालले, 10 वर्षांच्या लढ्याला यश आले.. ‘अक्षय कुमारचा’ तो ‘डायलॉग’ अखेर ‘दादांनी’ खरा केलाच..

अब्बास शेख

दौंड : जो मै बोलता हू, वो मै करता हू… हा अक्षय कुमारचा फेमस डायलॉग सर्वांनाच तोंड पाठ आहे. बातमीची हेडलाईन वाचून आता तुम्ही म्हणाल हा डायलॉग आणि आमदार राहुल कुल यांचा काय संबंध..? तर थोडं थांबा आणि हा डायलॉग पुन्हा आठवा. आता तुमच्या लक्षात आले असेल की या डायलॉगमध्ये अक्षय कुमार म्हणतो, ‘जे मी बोलतो ते मी करतोच’ असेच एक वाक्य म्हणा किंवा मागणी अथवा प्रतिज्ञा म्हणा, दौंड चे विद्यमान आमदार आणि 10 वर्षांपूर्वीचे भीमा पाटस चे चेअरमन राहुल कुल यांनी केली होती. ती प्रतिज्ञा होती प्रांत कार्यालय दौंडमध्ये करण्याची… (त्या मागणीची आम्ही केलेली बातमी येथे पुरावा म्हणून देत आहोत)

प्रांत कार्यालयावरून कुल-थोरात यांच्यात वाद... 2013-14 साली त्यावेळचे विद्यमान आमदार रमेश थोरात आणि भीमा पाटस चे चेअरमन राहुल कुल यांच्यात प्रांत कार्यालयावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले होते. यावेळी राहुल कुल यांनी तत्कालीन आमदार रमेश थोरात यांच्यावर टीका केली होती त्याची आम्ही केलेली बातमी येथे देत आहोत.

9 वर्षांपूर्वी राहुल कुल आमदार होताच पाठपुराव्याला सुरुवात… 2014 साली राहुल कुल प्रथमच आमदार झाले त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रांत कार्यालय दौंड ला आणण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. मात्र आमदार रासप चे आणि सत्ता भाजप, रासप व इतर मित्र पक्षांची त्यामुळे कुल यांना अनेकवेळा अडचणी उभ्या राहत होत्या तरीही त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवून अखेर दौंडला प्रांत कार्यालय मंजुर करून घेतलेच. नोटिफिकेशन निघाले मात्र हे होत असताना पुन्हा 2019 ची विधानसभा निवडणूक लागली. यावेळीही राहुल कुल आमदार झाले मात्र सत्तानाट्य सुरु होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, कोरोना लाट आली त्यामुळे काही काळ हा त्यामध्ये निघून गेला. मात्र आमदार राहुल कुल यांनी जोपर्यंत प्रांत कार्यालय आणि त्याची अधिकारी भरतीची सूचना निघत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहिले आणि आज 6 ऑक्टोबर 2023 रोजी अखेर प्रांत कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याच्या दृष्टीने शासकीय आदेश निघाला आणि खऱ्या अर्थाने आमदार राहुल कुल यांच्या 10 वर्षांच्या पाठपुरावा, मेहनतीला यश आले आहे. आता लवकरच येथील अधिकाऱ्यांच्या जागा भरून दौंडचे स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु होत आहे. ही दौंडकरांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

दौंड प्रांत कार्यालयाबाबत शासनाचे पत्र…

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील दौंड व पुरंदर या दोन तालुक्यांसाठी १ उप-विभागीय कार्यालय
असून त्याचे मुख्यालय सासवड- पुरंदर येथे आहे. तथापि, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण इ. बाबींमुळे सध्याच्या दौंड-पुरंदर या उप-विभागीय
कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वाचा क्र. २ येथे नमुद शासन अधिसूचनेन्वये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याकरीता दौंड येथे स्वतंत्र उप-विभाग स्थापन करण्यात आला आहे. सदर उप-विभागाकरीता स्वतंत्र उप-विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
असा आहे शासन निर्णय :-
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याकरीता दौंड येथे स्वतंत्र उप-विभागीय कार्यालय स्थापन
करण्यास व सदर कार्यालयासाठी खालील ५ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजुर करण्यास शासन मान्यता देत आहे. सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.