क्राईम

Kolhapur | कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश, गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई

कोल्हापूर : (सुधीर गोखले) आज शहरातील राजारामपुरी परिसरातील श्री हाॅस्पिटलवर मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी मोठे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी गर्भ निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर मनपा हद्दीत आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची खात्रीशीर कारवाई मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाने छापा टाकला असता श्री हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकाला 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
रोख 15 हजार स्वीकारताना व्यवस्थापकाला रंगेहाथ पकडला
कोल्हापूर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्या पथकाने श्री हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी गर्भलिंग निदान मशीन बंद अवस्थेत भासवून गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. आरोग्य विभागाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी रोख 15 हजार रुपये स्वीकारताना व्यवस्थापकाला रंगेहाथ पकडला गेला.
स्टिंग ऑपरेशनमुळे भांडाफोड
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे डॉ. रमेश जाधव यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांनी एका पेशंटच्या बहिण म्हणून हाॅस्पिटलमध्ये येत स्टिंग ऑपरेशन केलं. त्यांना अंकिता आणि दिग्विजय कालेकर या दाम्पत्याची साथ मिळाली. त्यामुळे शहरातील आणखी एका रुग्णालयाचा भांडाफोड झाला आहे.
गर्भलिंग निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस
दुसरीकडे, राधानगरी भुदरगड तालुक्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश राधानगरी पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला केला होता. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरु आहे. एक महिन्यापूर्वी चार फरार आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक झाली आहे. जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील अजूनही दोन आरोपी फरार आहेत

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

11 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

12 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

15 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago