Kolhapur | कोल्हापुरजवळ भर दिवसा पावणे दोन कोटीचा धाडसी सशस्त्र दरोडा 

सुधीर गोखले

कोल्हापूर : कोल्हापूर नजीक च्या बालिंगा येथील सराफी दुकानावर भर दिवसा चार सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला सुमारे पावणे दोन कोटींचा हा दरोडा असून सांगली पाठोपाठ कोल्हापूर येथे दरोडा पडल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहे.

नुकताच सांगली येथे रिलायन्स ज्वेल या सराफी शोरूम वर दरोडा पडला होता अजूनही त्याचा तपास सुरू असताना कोल्हापुरातील या दरोड्याने पोलीस यंत्रणेला घाम फुटला आहे. बालिंगा येथील सराफी दुकानावर पडलेल्या या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल गोळीबार केला आणि दुकान मालकांना मारहाण केली यामध्ये दुकान मालक गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बालिंगा गावात मुख्य रस्त्यावरील तिकटी नजीक कात्यायनी ज्वेलर्स या रमेश शंकरजी माळी वय ४० यांच्या मालकीच्या सराफी दुकानावर भर दिवसा हा सशस्त्र दरोडा पडला या दरोड्यात रमेश शंकरजी माळी आणि त्यांचे मेव्हणे जितू मोडयाजी माळी (वय ३० रा दोघेही बालिंगा) यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या डोक्यात दरोडेखोरांनी बेसबॉल ची स्टिक घातली त्यामुळे ते गंभीर जखमी झाले यावेळी त्यांचे मेव्हणे जखमी झाले. 

दोन दरोडेखोर दुकानात शिरल्यावर एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील सर्व दागिने पिशवीमध्ये भरण्यास सांगितले दुकान मालक रमेश माळी यांनी विरोध केल्यावर त्यांना एका दरोडेखोराने मारहाण करण्यास सुरुवात केली तर दुसऱ्याने दुकानातील कपाटाच्या काचा फोडल्या आणि चाळीस ट्रे मधील तीन किलो दागिने आणि दीड लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले.

गावातील काही तरुणांनी त्यांच्यावर दगड फेकही केली मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने तरुण माघारी पळून आले दोन दुचाकी वरून हे चार दरोडेखोर गगनबावड्याच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आसपासच्या दुकानातील नागरिकांनी तातडीने करवीर पोलिसांना हि कल्पना दिली जखमींना राजारामपुरीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती गंभीर आहेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, निरीक्षक अरविंद काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण  शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह फॉरेन्सिक पथक ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाने मग काढण्याचा प्रयत्न केला मात्र फारसे काही हाती लागले नाही. यावेळी तिथे घडलेल्या घटनेवेळी लपून बसल्याने दुकान मालक माळी यांचा मुलगा पियुष बचावला त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली तसेच स्ट्रॉंग रूम मधील रोकड आणि दागिने सुरक्षित राहिले आहेत.