पुणे : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या किरण गोसावीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तीन वर्षे जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात गोसावीला साक्षीदार बनवल्यानंतर तो फरार झाला होता. त्यांचे अंगरक्षक प्रभाकर सेलने गोसावी याच्यावर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
के.पी.गोसावी हा तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करायचा. पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिटने गुरुवारी सकाळी त्याला याच आरोपावरून अटक केली. बुधवारी रात्री उशिरा तो पुणे पोलीसांना पुण्यात शरण येणार असल्याची चर्चा होती. किरण गोसावी हा मुंबईतून उत्तर प्रदेशात पळून गेला होता आणि लखनौसह अनेक जिल्ह्यांमध्ये त्याने आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके लखनौला पोहोचली होती. मात्र, तो लखनौमधून पळून गेला आणि मंगळवारी त्याचे शेवटचे लोकेशन सुलतानपूरमध्ये सापडले.
त्याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या त्याला फरासखाना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वत: त्याची चौकशी करण्यासाठी आले आहेत. गोसावी याच्यावर फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल आहेत. 2018 मध्ये पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
Home Previos News आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार ‛किरण गोसावी’ ला ‛फसवणूक’ प्रकरणी पुणे...