अपहरण करून खंडणी गोळा करणारी टोळी 5 गावठी पिस्टल, जिवंत काडतूसांसह जेरबंद

पुणे : शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात अपहरण करून दहशत करत खंडणी गोळा करणारी टोळी पाच गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील गावांमध्ये अवैध गावठी पिस्टल, हत्यारे बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करून मारहाण करणे, दहशत करून खंडणी गोळा करणारी टोळी सक्रिय झाली होती.

लियाकत नुरइस्लाम मंडल (वय ५४ वर्षे, रा. निरगुडसर ता. आंबेगाव जि. पुणे) याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत काही इसमांनी त्याचे अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून त्याचे जवळील मोबाईल, पाकीट, पाच हजार रूपये असे काढून घेतले व त्याला मारहाण करत फाकटे गावचे हद्दीत नेवून बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आमचेकडून वाळू घ्यायची आणि दहा लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणून लियाकत मंडल याने पैसे देण्यास नकार दिल्याने अपहरण करणारे
व्यक्तींनी लाकडी काठी, दांडक्याने मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केला.

त्यावेळी अपहरण करणारे एका व्यक्तीने त्याचे
जवळील पिस्टल काढून कॉक केले आणि लियाकत मंडल याचे डोक्याला लावून, तुला आता खल्लास करतो, असे म्हणत पिस्टलचा ट्रिगर दाबत असताना लियाकत मंडल याने एक लाख रुपये देतो असे सांगितलेने त्यास जिवंत सोडून त्याचे मुलाने एक लाख रूपये आणून दिले. नंतर लियाकत मंडल यास सोडून दिले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेला होता.

सदरचा प्रकार हा ग्रामीण भागात घडल्याने मा. पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण व मा. अपर पोलीस अधीक्षक साो. पुणे विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना व मार्गदर्शन करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून टोळी जेरबंद करणेबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर यांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. गुन्हयातील अपहरण करणारे आरोपी हे सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने आरोपी गुन्हा केलेनंतर परागंदा झाले होते. आरोपींचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून आरोपी हे वेगवेगळया जिल्हयात जावून ठिकाणे बदलून राहत होते.

आरोपींचे ठिकाणाजवळ पोलीस पथक पोहोचण्यापुर्वी आरोपी ते ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी जात होते. आरोपींची सखोल
माहिती काढून गुन्हयातील मुख्य तीन आरोपी हे कोरेगाव भिमा या परीसरात येणार असून ते मध्यप्रदेश राज्यात पळून जाण्याचे तयारीत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेले आरोपींमध्ये १) अंकुर महादेव पाबळे, (वय २६ वर्षे), २) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली श्रीकांत पाबळे, (वय २५ वर्षे, दोघे रा. कावळ पिंपरी ता शिरूर जि. पुणे) ३) विशाल ऊर्फ आण्णा शिवाजी माकर, (वय २३ वर्षे, रा. ढोकसांगवी ता शिरूर जि. पुणे) अशी असून त्यांनी सर्वांनी आरोपी ४) दिलीप रामा आटोळे (वय ४५ वर्षे, रा. जांबुत दुडेवस्ती ता. शिरूर जि पुणे), ५) निलेश बबन पळसकर, (वय ३५ वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि पुणे) यांनी सर्वांनी गुन्हा करण्याचा कट रचून गुन्हा करणेसाठी पाच गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे उपलब्ध करून गुन्हा केला आहे.

सर्व आरोपी ताब्यात घेवून चौकशी करता यातील आरोपी दिलीप आटोळे हा वाळू व्यावसायिक असून आरोपींचे ताब्यातून पाच गावठी पिस्टल, नऊ जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले असून ३४००/- रूपये व फिर्यादीचे काढून घेतलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मो.सा.ची चावी, लाकडी दांडके हस्तगत करणेत आलेले आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, साो. मा. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पो नि संजय जगताप, स्थागुशा चे पथकातील पो. स.ई. गणेश जगदाळे, पोहवा तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके,

योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकात जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हेमंत विरोळे, पोना धिरज जाधव, समाधान
नाईकनवरे, बाळासाहेब खडके, शिरूर पो.स्टे. चे पोसई अभिजीत पवार, सफौ जी. एन. देशमाने, पोहवा नितीन सुद्रीक, पोना बाळू
भवर, पोना एन. जगताप, पोना व्ही मोरे, पोकॉ एन. थोरात, पोकॉ. ए. भालसिंग, पोकॉ. आर. हाळनोर, मपोकॉ, पी. देशमुख यांनी
केली असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत. आरोपींना दि. २१/१०/२०२३ रोजी पर्यत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे.