दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी खडके तर सचिवपदी शेख

अख्तर काझी

दौंड : महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणी दौंड तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेठ जोतीप्रसाद महाविद्यालय, दौंड या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, उपाध्यक्ष मिलिंद शिरसागर, दीपक कात्रे (सदस्य पुणे जिल्हा संघ), दादासाहेब काकडे (सदस्य पुणे जिल्हा महासंघ ) हे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. दौंड तालुक्यातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, दौंड तालुक्यातील क्रीडा संस्कृती अबाधित राहावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

कार्यक्रमादरम्यान दौंड तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या दौंड तालुका शाखेचे नवनिर्वाचित नामदेव दत्तात्रय खडके (श्री फिरंगाईमाता माध्य. व उच्च माध्य.विद्यालय कुरकुंभ)यांची नियुक्ती दौंड तालुका अध्यक्ष म्हणून करण्यात आली व सचिवपदी फारूख बशीर शेख(दौंड फुटबॉल अकॅडमी,दौंड) यांची नियुक्ती केली. लवकरच दौंड तालुक्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या महासंघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव बागल, प्रविण होले, विश्वास भोसले, राजेंद्र साळवे, विशाल पवार, भुषण कापुरे, संतोष आटोळे, किशोर शिंदे,उमेश पलंगे, ललित सोनवणे, महेंद्र भोसले, निखिल पवार, विलास थोरात, विष्णू मार्कड ,तुकाराम गवळी , उज्वला थोरात, कोमल जोगळेकर, शेख मॅडम, जॉन्सन बर्नाट, प्रसाद धिवार,सुरज मोरे, मंगेश चव्हाण, निखिल पवार , नंदकिशोर जगताप, भगवान गिरमे महेश ,हुल्लेकर सोनाली, सोनम बहोत, मनीषा नडगमकर, सनी वाल्मिकी, अनिकेत कसबे ,अक्षय सावंत, गोसावी, साईबाबू पाडे, संतोष सोनवणे आदी क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव पाटील यांनी केले.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago