अभिनेत्री ‘केतकी चितळे’ विरोधात पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस ‘आक्रमक’, गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे :

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुक पेजवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टिका केल्यानंतर महिला राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

त्यामुळे आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केतकी चितळे हिने केलेली फेसबुक पोस्ट व त्या संबंधित असणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोलप साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केतकी चितळेने केलेल्या फेसबुक पोस्ट नंतर तिच्यावर सर्व स्तरांतून टिका केली जात असून नेटकऱ्यांनीही तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

सासवड येथे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देताना पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांसह पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.