Categories: क्राईम

बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करा, दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेल ची मागणी

दौंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, लोकनेते शरद पवार यांना उद्देशून त्यांच्या शारीरिक व्यंगावरून लिहिलेला बदनामीकारक मजकूर आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून सर्वत्र प्रसारित करणाऱ्या केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,लिगल सेल(दौंड) च्या वतीने करण्यात आली. लिगल सेल चे अध्यक्ष ऍड. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दौंड पोलिसांना याबाबतचे निवेदन दिले.

केतकी चितळे हिने तिच्या फेसबूक अकाउंटवरून दि.13 मे रोजी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून बदनामीकारक पोस्ट केली आहे. त्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते व सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्रतेची भावना निर्माण झाली आहे. तिच्या या संतापजनक कृत्यामुळे सर्वत्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. केतकी चितळे हिने लोकांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलेले आहे. त्यामुळे केतकी चितळे तसेच नितीन भावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी ऍड. सुरेश जाधव, अजित बलदोटा, कावेरी गुरसळ, तसेच मा.नगरसेवक इस्माईल शेख उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago