Categories: राजकीय

केडगाव | ‛नागेश्वर सहकारी’ सोसायटीच्या संचालकपदी ‛शहाजी शेळके’ यांची ‛बिनविरोध निवड’

विकास शेळके

पारगाव : नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी शहाजी शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नागेश्वर वि.का.सोसायटी च्या रिक्त झालेल्या पदासाठी आज दि. ९/०८/२०२३ रोजी निवडणूक पार पडली त्यामध्ये शहाजी महादेव शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काही महिन्यापूर्वी नागेश्वर सोसायटीची निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये राजेंद्र शेळके हे निवडून आले होते मात्र त्यांची निवड अवैध ठरल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त झालेल्या पदाची आज निवडणूक पार पडली. या पदासाठी शहाजी शेळके यांचा एकमेव अर्ज उपलब्ध झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.टी राठोड यांनी काम पाहिले याबाबतची माहिती सोसायटी चे सचिव श्री. विश्वास किसनराव पवार, क्लार्क गणेश पांडुरंग शेळके यांनी सहकारनामा ला दिली.

शहाजी शेळके यांची बिनविरोध निवड जाहीर होताच संचालक मंडळ व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडात शहाजी शेळके यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी केडगाव पंचक्रोशीतील सोसायटीचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते तर मोहन दाशरत शेळके, सचिन लालासो शेळके, राजाराम नारायण शेळके, धोंडीबा एकनाथ शेळके, विठ्ठल गणपत चव्हाण, समाधान पांडुरंग हंडाळ, अरुण देशमुख, प्रमोद निंबाळकर, विकास कांबळे, संपत शेळके, शोभा उत्तम देशमुख, अंजना कैलास शेळके विलास शेळके, गोरख शेळके, मनोज शेळके, दत्ता आबा शेळके, राजेंद्र शेळके, उत्तम पर्वतराव देशमुख, राहुल शेळके हे आवर्जून उपस्थित होते. धनंजय बापू शेळके यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानत शहाजी शेळके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago