क्राईम

केडगाव येथील संस्थेची जमीन बोगस सही, शिक्के वापरून विकली, केडगाव आणि पुण्यातील 6 जणांवर गुन्हा दाखल

दौंड : केडगाव ता.दौंड येथील संस्थेची जमीन बनावट इसम उभा करून तसेच संस्थेचे बनावट सही, शिक्के वापरून खरेदी खत केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सौ. निसा हुसमेद मेहदियाबदी, [वय 50 वर्षे, नाना पेठ, पुणे] यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहराब रूस्तुम यगानगी, [वय 45 वर्षे,रा. विल्यम्स गार्डन, पुणे कॅम्प पुणे] 2) महेष दत्तात्रय काशीद [रा.मेडद,ता.बारामती,जि.पुणे] 3) पंढरीनाथ गुलाबराव भंडलकर, [रा.नानगांव,ता.दौंड ,जि. पुणे] 4) अमोल बापु भोसले [रा.खंडोबानगर, रा. बारामती,जि.पुणे] तसेच मो. इम्तियाज कासम अन्सारी [वय ४७ रा.मोहमदवाडी, हडपसर, पुणे] रवींद्र गोविंद गाडेकर [वय ४४ रा. केडगाव,ता.दौंड]
३) पंढरीनाथ गुलाबराव भांडलकर [वय ५० रा. दापोडी, ता.दौंड, जि. पुणे] यांच्यावर गुन्हा दाखल केला असून  गुन्ह्यातील अटक आरोपी रवींद्र गाडेकर व महेश काशीद यांनी गुन्ह्याच कट रचून अटक आरोपी इम्तियाज अन्सारी याचे बनावट पॅनकार्ड, आधरकार्ड व बहाई संस्थेचे बनावट लेटर, शिक्के तयार करून संस्थेची जमीन विक्री करुन खरेदी खत केले असल्याचे म्हटले आहे.

वरील आरोपींनी दि.29/10/2021 ते 13/10/2022 रोजी दरम्यान केडगांव,[ता.दौंड,जि.पुणे] येथे संगणमत करून फिर्आयादी यांच्या संस्थेचे बनावट लेटर पॅड, संस्थेचे बनावट शिक्के तयार केले. तसेच संस्थेच्या चेअरमन व सेक्रेटरी यांच्या  बनावट सह्या करून त्यांच्या आधारे केडगांव येथील दुय्यम निंबधक कार्यालयात  सस्थेच्या मालकीची केडगांव येथील जमीन गट नं.191 चे खरेदीखत दस्त करून  सस्थेची व शासनाची फसवणुक केली असल्याने फिर्यादी सौ. निसा हुसमेद मेहदियाबदी यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास यवत चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमंलदार सपोनि बावकर हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

4 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago