Categories: राजकीय

केडगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक | ‘केडगाव विकास आघाडी’ की ‘कुल-थोरात’ युती याबाबत मोठ्या वाटाघाटी ! कुल-थोरात युती झाल्यास तालुक्यात पडसाद उमटणार, ‘या’ गटाला सर्वाधिक फटका बसणार

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उप सरपंचपदासाठी उद्या निवडणूक होत आहे. उपसरपंच आपलाच व्हावा या साठी कुल आणि थोरात गटाने मोठी तयारी केली आहे. केडगाव ग्रामपंचायतमध्ये कुल गटाचे आठ सदस्य निवडून आले आहेत तर थोरात गटाचे अवघे तीन आणि एक बंडखोर असे चार सदस्य निवडून आले असून याठिकाणी बाळासो कापरे यांच्या केडगाव विकास आघाडीचे पाच सदस्य निवडून आले आहेत. केडगाव विकास आघाडीमध्ये असणारे अनेक दिग्गज हे माजी आमदार रमेश थोरात यांना मानणारे आहेत मात्र थोरात यांचे काही जवळचे कार्यकर्ते हे थोरात यांचेच ऐकत नसल्याने आणि कायम बहुजन डावलले जात असल्याच्या संशयातून सर्व नाराज कारकर्त्यांनी केडगाव विकास आघाडी स्थापन करत विजयश्री खेचून आणली आहे.

निवडून येईपर्यंत आप्पा आणि नंतर… मात्र याठिकाणी आताही पुन्हा तसेच काहीसे चित्र दिसत असून, थोरात यांचे निवडून आलेले काही सदस्य पुन्हा एकदा त्याच पद्धतीने वागू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे केडगाव विकास आघाडीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य दिसू लागले आहे. निवडून येईपर्यंत आप्पा आणि निवडून आले की दुसऱ्यांच्या माळा जपा असा काहीसा अनुभव जुने कार्यकर्ते कथन करत आहेत. त्यामुळे केडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पद जर थोरात गटाला हवे असेल तर थोरात गटाला केडगाव विकास आघाडीची मदत घ्यावी लागणार आहे. अन्यथा कुल थोरात समीकरणात तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाणार आहे असे काही कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत.

कोण आहे केडगाव विकास आघाडी.. केडगाव विकास आघाडीमध्ये बाळासो कापरे यांसह पाराजी हंडाळ, भगवान गायकवाड, माणिक राऊत, सुदाम हंडाळ, पांडुरंग राऊत, विष्णूपंत हंडाळ, पोपट लाड यांचा सहभाग आहे. केडगाव विकास आघाडीची साथ जर थोरात गटाला मिळाली नाही तर येथेही त्यांना कुल गटाकडून शह मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र जर ‘कुल’ आणि ‘थोरात’ गट येथे एक झाले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये याची मोठी किंमत थोरात गटाला संपूर्ण तालुक्यात मोजावी लागणार आहे. येणाऱ्या सोसायटी, झेडपी, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीला थोरात गटात धडाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उणीव भासणार आहे. जे केडगावमध्ये घडले ते नाईलाजाने तालुक्यात घडणार अशी चिंता काही कार्यकर्ते बोलून दाखवत असून यामुळे तालुक्यात वेगळीच समीकरणे जुळून येण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

आम्ही भांडायचे आणि तुम्ही एक व्हायचे हे आता चालणार नाही कुल-थोरात यांच्या वादात अनेकवेळा किंमत मोजावी लागणारे थोरात गटातील कार्यकर्ते आता कुल-थोरात गटाच्या युतीवरून थोरात गटाला पर्यायाने अप्पांना जाब विचारून याचा झटका येत्या निवडणुकांमध्ये देण्याची दाट शक्यता आहे तर कुल गटातही गट-तट म्हणून अर्धे आयुष्य राजकारणात वाहून घेतलेले कार्यकर्ते तुम्हीच एक होत असाल तर आम्ही एक का नको असा सवाल उपस्थित करण्याची शक्यता आहे.

उपसरपंच पदासाठी मोठ्या वाटाघाटी, माघार आणि पुन्हा तसेच… दोन दिवसांपूर्वी थोरात गटातील काहीजण केडगाव विकास आघाडी फॅक्टरवर नाराजी दाखवत त्यांनी बहुजन फॅक्टरला मात देण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये भोगावा लागू शकतो हे ध्यानात आल्यानंतर मात्र त्यांनी सावध भूमिका घेतली आणि उपसरपंच पदासाठी कुल, थोरात गटाची होणारी युती येथे ऐनवेळी भंग पावली. मात्र आजपासून पुन्हा एकदा वाटाघाटीला जोर आला असून आज पुन्हा एकदा थोरात आणि कुल गटातील काही महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये संपर्क होऊन त्यांच्या गुप्त बैठका झाल्याची चर्चा संपूर्ण केडगावात होत आहे. त्यामुळे कुल-थोरात अशी युती जर उपसरपंच पदासाठी झाली तर तालुक्यात याचा सर्वात जास्त फटका हा थोरात गटाला बसेल अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तर थोरात गटातील काहीजण केडगाव विकास आघाडी चालतेय पण ‘कापरे’ नको असा सुर काढत असून कापरे नको मग त्यांचे सदस्य कसे चालतात असा सवालही काहीजण उपस्थित करत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago