Categories: राजकीय

‛केडगाव’च्या ‛उपसरपंच’ पदी सतीश बारवकर यांची ‛बिनविरोध’ निवड

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सतीश पंढरीनाथ बारवकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबत केडगावचे सरपंच अजित शेलार पाटील यांनी ‛सहकारनामा’ ला माहिती दिली आहे.
अशोक हंडाळ यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदावर आमदार राहुल कुल गटातूनच दोनजन इच्छुक असल्याने केडगावचा उपसरपंच नेमका कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाकडून उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र यावेळी त्यांच्या गटातून कुणाचाही उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत आलाच नाही. त्यामुळे उपसरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज हा सतीश बारवकर यांचा आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे केडगावचे सरपंच अजित शेलार यांच्याकडून घोषीत करण्यात आले. यावेळी केडगावचे ग्रामविकास अधिकारी काळे भाऊसाहेब हे उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago