मुंबई : सहकारनामा
धनंजय मुंडे यांच्या मुलांच्या आई असणाऱ्या करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार देऊन फेसबुकवर पोस्ट व्हायरल केल्यानंतर आता धनंजय मुंडेंनीही आपली बाजू काही माध्यमांसमोर मांडल्याचे या माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
या माध्यमांना मुंडे यांनी दिलेल्या माहिती नुसार आपण या प्रकरणाबाबत स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि न्यायालयाने करुणा यांना मनाई आदेशही दिला आहे.
आमच्या आणि मुलांच्या विवादावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही पक्षाच्या सहमतीने मध्यस्थाची विनंती केली आणि उच्च न्यायालयाने निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मध्यस्थ म्हणुन नियुक्तीही करण्यात आले आणि काही बैठकाही झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच पुढील बैठक हि १३ फेब्रुवारी रोजी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे सर्व होत असताना आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यस्थाची प्रक्रिया सुरु असताना मुलांच्या ताब्याबाबत तक्रार करणे हे त्यांच्या हेतूबद्दल शंका येणारे असून यात माझी बदनामी करण्याचाच हा हेतू असल्याचे जाणवत असून त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.