अहमदनगर/कर्जत : कर्जत पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्ष धुळखात पडलेल्या तसेच ठाण्याच्या सुशोभिकरणास बाधा ठरत असलेल्या बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध लावण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. यापूर्वी बेवारस वाहने 32 सोडण्यात आली असून गंगामाता वाहन शोध संस्था पथक परंदवाडी (ता.मावळ जि.पुणे) यांच्या मदतीने तब्बल 84 बेवारस तसेच वेगवेगळ्या खटल्यातील वाहने मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.
कर्जत पोलीस स्टेशन व गंगामाता वाहन शोध संस्था पथकाने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाने सर्वसमान्य नागरीकांकडून कौतुक केले जात आहे. पोलीसांनी अनेक गुन्ह्यांतील प्ररकरणात जप्त केलेल्या अपघातातील वाहने, न्यायालयीन प्रकिया तसेच वाहन मालकांची उदासिनता त्यामुळे आपले वाहन घेवून जाण्यास बहुतांश वाहन मालक टाळाटाळ करतात. कंटाळा करित असतात अशी वाहने पोलोस टाणे आवारात बेवारस म्हणुन धुळखात पडुन असतात.
परिणामी पोलीस ठाणेच्या परिसराच्या सुशोभिकरणास बाधा निर्माण होते. पोलीस ठाणेस बकालपणा प्राप्त होतो. ही बाब लक्षात घेवून कर्जत पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बेवारस वाहनांच्या मुळ मालकांच्या शोध घेण्याचा पुढाकार घेतला. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनानुसार अशा बेवारस वाहनांच्या मुळ मालकांच्या युध्द पातळीवर शोध मोहीम सुरु झाली वाहनांच्या चेशी नं व इंजिन नंबर वरुन मुळ मालकांची यादी तयार करण्यात आली आहे . .शोध लागलेल्या वाहन मालकांचे नाव व पत्ता वाहनांचा नोंदणी क्रमांक वाहनाचा प्रकार , चेसी.नं व इंजिन नं यादी कर्जत पोलीस टाणेत लावण्यात आली आहे . ज्या वाहनांचे मालकांचे नाव , पत्ते मिळुन आले आहेत आशा लोकांना रजिस्टर पोस्टाने आपले वाहन घेवून जाणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सदर यादीमध्ये आपले नाव असल्यास अशा वाहन मालकांनी स्वताचा फोटो असलेले ओळखपत्र , तसेच आवश्याक ती कागदपत्रे दाखवुन आपले वाहन १५ दिवसाच्या आत घेवून जायचे आहे . अन्यथा सदरच्या वाहनांचा बेवारस म्हणुन लिलाव करणेबाबतची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. अशी वाहने घेवून न गेल्यास बेवारस वाहनांची सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार आहे . पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतिष गावित , पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे . उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोसई अनंत सालगुडे कारकुन पोहेकॉ / २ ९ ७ सगळगिळे , पोकॉ / २५७८ जाधव व पोकों / खिळे गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष श्री राम उदावंत , उपाध्यक्ष श्री बाबासाहेब बागडे , श्री संजय काळे व सर्व टीम यांनी ही शोध मोहीम राबवली आहे .
कर्जत पोलीस स्टेशन येथे खाली दिलेल्या गाड्या या मुळ मालकाने कागदपत्र दाखवुन 15 दिवसाच्या आत घेवुन जावात या बाबत दुस-यांदा कळविण्यात येत आहे . अन्यथा कायदेशीर प्रक्रिया राबवुन लिलाव करण्यात येणार आहे.