दौंड : शालेय शिक्षण क्रीडा विभाग,क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये दौंड मधील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाचा विद्यार्थी करण गायकवाड याने सुवर्णपदक पटकाविले.
या सुवर्ण कामगिरीमुळे त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जेजुरी येथे पार पडलेल्या स्पर्धेत जवळपास 150 खेळाडूंनी (14-16-19 वयोगट) सहभाग नोंदविला. त्यापैकी 25 खेळाडू दौंड तालुक्यातील होते. करण गायकवाड याने 19 वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक पटकाविले.
दौंड पोलीस स्टेशन येथे सहा. पो. उप. निरीक्षक पदावर कार्यरत असणारे महेंद्र गायकवाड यांचा मुलगा करण याने तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवीण होले व साईबाबा पहाडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक
फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…
रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…