श्रीमती ‘कनिझ खातून काझी’ यांचे निधन

दौंड : श्रीमती कनिझ खातून शफी काझी (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माजी दिवंगत नगरसेवक तथा वाहतूक व्यावसायिक शफी काझी यांच्या त्या पत्नी होत.

त्यांच्या पश्चात पटकथा, नाट्य व चित्रपट लेखक राज काझी, मुख्याध्यापिका समीना काझी, पत्रकार अख्तर काझी ही अपत्ये  आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे.