Kangana’s twitter account suspend – कंगनाला टीव टीव नडली! अखेर ट्विटरने कंगनाचे अकाउंट केले सस्पेंड



| सहकारनामा |

मुंबई : आपल्या ट्विटमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या (Kangana’s twitter account suspend) बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ला ट्विटर ने दणका देत तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले आहे. 



नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊन त्याचा परवा निकाल घोषित करण्यात आला या निकालात ममता बॅनर्जींच्या Tmc ने 207 पर्यंत जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता. या निकालानंतर कंगनाने राणावत ने  वादग्रस्त ट्वीटची मालिका सुरू केली होती. तिच्या या कृत्याने तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड (Kangana’s twitter account suspend) करण्यात आले आहे.

कंगणाच्या वादग्रस्त ट्विट  आणि वक्तव्यांनंतर  तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. 

तिच्यावर पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना अॅडव्होकेट सुमित चौधरी यांनी ईमेलद्वारे तक्रार दिली गेली आहे आणि या तक्रारीत कंगनाच्या वक्तव्यांमुळे बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचे आणि तिने बंगालच्या नागरिकांचा अपमान केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.