kangana ranaut corona positive – कंगना राणावत ‛कोरोना’ पॉझिटिव्ह : ANI



| सहकारनामा |

मुंबई : आपल्या वक्तव्यांनी कायम वादात असणारी सिने अभिनेत्री कंगना राणावत ची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत ANI ने तिच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

कंगना राणावत हि आपल्या वक्तव्यांमुळे कायमच वादात राहिली आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे आणि तिच्या ट्विटरवरील ट्विट्समुळे नुकतेच तिचे ट्विटर अकाउंट ट्विटरने कायम स्वरूपी सस्पेंड केले होते.

कंगणाने नुकतेच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणूक निकाल आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत वादग्रस्त ट्विटची मालिकाच लावली होती.

ट्विटरने तिचे अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड करणे हा कंगना राणावतला हा मोठा धक्का समजला जात होता, तर  आता तिला कोरोना झाल्यामुळे पुन्हा दुसरा धक्का बसला आहे.