प्रज्ञा निकम हिची ‛ज्युनियर रिसर्च फेलोशिप’साठी निवड, दौंडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

दौंड : महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नॅशनल केमिकल लॅबरोटरीज पुणे यांच्या ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी प्रज्ञा राजू निकम हिची निवड झाली आहे.प्रज्ञा हिचे मूळ गाव खडकी ता.नगर असून ती सध्या दौंड जि.पुणे येथे रहाते.तिचे बारावी पर्यंत चे शिक्षण सेंट सँबँस्टीयन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दौंड या ठिकाणी झाले.बीएस्सी मायक्रोबायोलॉजी ची पदवी टी. सी.कॉलेज बारामती येथून तर एम एस्सी मायक्रोबायलॉगी चे पदव्युत्तर शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पूर्ण केले.पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेज मधून तिने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेकनॉलॉजी उत्तम गुणवत्तेने पूर्ण केला.तसेच आयसीएआर ची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. तिला तिच्या सर्व शिक्षकांबरोबर आई सीमा आणि रेल्वे मध्ये उच्च पदस्थ असणारे वडील राजू निकम यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होतं आहे. पो. उप.अधीक्षक सुभाष निकम, बाळासाहेब निकम, दौंड चे माजी नगर सेवक डॉ.मुकुंद भोर,लर्न &प्ले शाळेच्याअध्यक्ष सविता भोर,दौंड शिवसेनेचे नेते मा.नगरसेवक अनिल(तात्या)सोनवणे यांनी तिचे अभिनंदनकेले आहे..