राजकीय : पत्रकारिता कशी करावी यावर दौंड शहरातील एका नेता भाईंनी म्हणे लंबे चौडे भाषण दिले. अण एका स्वयंघोषित सोशल मीडिया ठिकाकाराने ते मीठ मिर्ची लावून सोशल मीडियावर मांडले. या नेत्यांचा रोख हा पत्रकारांच्या लिखानावर होता. बरं या नेत्यांना पत्रकारितेचा ‘प’ सुद्धा माहित आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. एक-दोन सोशल मीडिया लेखक चार दिवस गाडीत फिरवले, त्यांना खायला प्यायला सांभाळले म्हणजे सर्व पत्रकार असेच असतात असे मानून आपल्याला पत्रकारितेचे अगाध ज्ञान प्राप्त झाले असा गोड गैरसमज बहुतेक या भाईंनी झालेला दिसत आहे.
पत्रकारांनी काय लिहावे आणि काय नाही हे पत्रकारांच्या ‘ज्ञानाचा’ भाग असून यात अनुभवाचा सुद्धा जास्त संबंध येत नाही. अनेकजण वर्षानुवर्षे पत्रकारिता करत आले आहेत मात्र पत्रकारितेची मूल्ये काय आहेत आणि कोणत्या थरापर्यंत आपण एखाद्यावर टिका, टिप्पनी करावी याला पत्रकारितेमध्ये मर्यादा घालून दिलेल्या आहेत. मात्र काहींनी संपूर्ण आयुष्य पत्रकारितेमध्ये घालवले असताना टिका, टिप्पणी सोडून अजून साधे समाजपयोगी लिखाण सुद्धा त्यांना करता येत नसेल तर तो पत्रकार नव्हे तर तो सिजनेबल चाटुकार आहे असे मानले तर वावगे ठरणार नाही. दहा वर्षांत एकही भरीव काम सांगू न शकणाऱ्या नेत्याची बेंबीच्या देठापासून ओरडून हवा करू पाहणाऱ्या या सोशल मीडिया बहाद्दरांना अधिकृत पत्रकारांनी चाटुकार असे अनेकवेळा संबोधले आहे, असो विषय सुरु होता भाईंचा…
तर भाईंनी शहरात मोठे भाषण दिले आणि पत्रकारांनी काय लिहावे, कसे लिहावे, कुणावर लिहावे हे सर्व आपल्या भाषणात सांगून टाकले. मात्र ज्यांनी राजकीय पक्षाची गुलामगिरी करून एकाची बाजू घेऊन दुसऱ्याच्या विरोधात दंड थोपटले असतील त्यांच्या अश्या पक्षपाती, हेकेखोर व्याख्यान रुपी भाषणाची गरज खरच पत्रकारांना आहे का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो अण याचे उत्तर अजिबात नाही असेच येते. त्यामुळे पत्रकारांनी काय लिहावे या पेक्षा आपण स्वतः काय केले हे जर या भाईंनी त्या भाषणात सांगितले असते तर कमीत कमी चार दोन मते तरी तयार झाली असती. पण ‘जिसकी अपनी झोली फटी हो वह दुसरोंके झोली के पेबंद पर कैसे हंस सकते है’ इतकेही या भाईंना समजायला नको का..?
टिकोजीरावाला हाताशी धरायचे अण पत्रकारांवर बोंबलत सुटायचे. तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या नेत्यांची तुम्ही गुलामी केली त्यांनी तुमचा टीश्यू पेपर इतकाच वापर करून तुम्हाला बाजूला केले हे आठ दिवसांपूर्वीच आपल्या लक्षात आले. ज्या नेत्यांचे सध्या तुम्ही जोडे उचलत आहात त्या नेत्यांनी आणि तुम्ही काय काय कामे केली हे जरी सांगितले तरी तेही नक्कीच छापले जाते मात्र त्यासाठी बोलावे लागतेच ना..
जो काम करतो त्याची पुराव्यासह बातमी केली जाते मात्र जे दहा वर्षांत काय काम केले हेच सांगत नाहीत त्यांची बातमी किंवा त्यांच्या कामाची बातमी यावी अशी अपेक्षा करणे हा बालिशपणाची नाही का..? भाई… त्यामुळे पत्रकारांना भाषण देण्यापेक्षा दहा वर्षातील भरीव कामांची यादी तुम्ही समोर मांडली तर तुम्ही पत्रकारांना विनंती करण्याची वेळच येणार नाही, आपोआप बातमी लागत राहील. मात्र तुम्हाला तुमच्या नेत्याजवळ किती किंमत आहे हे यावरूनच स्पष्ट होते की तुमचे निष्ठावंत बाजूला सारून ऐनवेळी अन्य उमेदवार निष्ठावंतांवर लादणे आणि तुम्ही स्टेजवर आचकट विचकट हसून त्यांचे स्वागत करणे या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट अजून काय असू शकते.
त्यामुळे पत्रकारांनी काय करावे यावर भाषण देत बसण्यापेक्षा आपण आजपर्यंत समाजासाठी काय केले ते सांगितले तर बातमीत ते नक्कीच छापता येईल. आपण किती नेत्यांचे आजपर्यंत गुणगान केले आणि त्यातून समाजाचे किती भले झाले हाही प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. त्यामुळे नको त्या टिकोजीरावांच्या नादाला लागून आपली घालवून घेण्यापेक्षा अजून चार दोन उंबरे झीजवले तर कमीत कमी नेत्यासमोर उभे राहण्याइतपत आपली आब्रू तरी वाचेल यात शंका नाही.. (टीप – इच्छा असेल तर क्रमशा..