Categories: क्राईम

दौंडमध्ये वाळू माफियांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई, वाळू माफियांच्या 1कोटी 50 लाख रुपयांच्या यांत्रिक बोटींना जलसमाधी

दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी थेट विधानसभेतच तालुक्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणी विषय मांडल्याने येथील महसूल व पोलीस प्रशासनाला दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रात दिवसा ढवळ्या धुडगूस घालणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला. मागील कित्येक वर्ष येथील वाळू माफिया संघटितपणे महसूलच्या काळ्या सोन्यावर बिनदिक्कतपणे डल्ला मारत होते परंतु येथील महसूल व पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा होता, माफियांवर ठोस कारवाई केली जात नव्हती. यावेळेस मात्र नाईलाजास्तव का होईना प्रशासनाने संयुक्तपणे वाळू माफियांवर कारवाई केल्याने तुर्तास तरी शेतकरी वर्ग व सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेत आमदार राहुल कुल यांनी अवैध वाळू उपसा प्रश्न मांडल्याने व त्याचा व्हिडिओ सर्वत्र वायरल झाल्याने येथील महसूल व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी आज दि. 25 मार्च रोजी सकाळपासूनच दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रात यांत्रिक बोटीने अवैध वाळू ची लूट करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई केली असल्याचे चित्र आहे. शहरालगतच्या कचरा डेपो या ठिकाणच्या वाळू माफिया च्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली, या ठिकाणच्या कारवाईमध्ये एकूण 20 यांत्रिक बोटी(1 कोटी 40 लाख रु) उध्वस्त करण्यात आल्या आहेत. नेहमीप्रमाणे एकही वाळूमाफिया महसूल व पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
तहसीलदार संजय पाटील, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago