सुधीर गोखले
सांगली : काही दिवसांपूर्वी खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील होणारा नियोजित ड्रायपोर्ट रांजणी ऐवजी सलगरे येथे ३५० एकर जमिनीवर तो उभा राहणार असल्याची माहिती दिली होती मात्र या स्वप्नांचा भंग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय कृती समिती चे सतीश साखळकर यांनी एका माहिती अधिकारांमध्ये यासंदर्भात मागवलेल्या माहिती मध्ये हा धक्कादायक खुलासा JNPT अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने केला आहे. राज्यात सध्या ड्रायपोर्ट ची संख्या जास्त असून आता भविष्यात कोठेही ड्रायपोर्ट उभे करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हणले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही ड्रायपोर्ट साठी सुरु असलेल्या प्रयत्नांना खीळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात खा संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. या कंपनीच्या माध्यमातून सलगरे येथील ड्रायपोर्ट साठी प्रयत्न सुरु केल्याचे म्हणले आहे.
रांजणी येथील होणाऱ्या ड्रायपोर्ट साठी JNPT हि कंपनी प्रस्तावित होती मात्र ती त्यावेळीच बाजूला झाली आता नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. माध्यमातून हा ड्रायपोर्ट होईल आणि पोर्ट ट्रस्ट ने दिलेल्या माहितीचा नियोजित सलगरे येथील ड्रायपोर्ट वर कोणताही परिणाम होणार नसल्याचा खुलासा खासदार पाटील यांनी दिला आहे.
मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी मागवलेल्या माहिती मधील पोर्ट ट्रस्ट च्या या धक्कादायक खुलास्यामुळे जिल्ह्यातील होणाऱ्या एकमेव विकास प्रकल्पाबद्दल संभ्रम अवस्था वाढली असून खा संजय पाटील यांना आता दिल्ली दरबारी आपले वजन वापरावे लागेल आणि हहा प्रकल्प खेचून आणावा लागेल तसेच आता लोकसभा निवडणुकाही तोंडावर असल्याने हा प्रकल्प भाजप साठी खूप महत्वाचा टप्पा असेल हे निश्चित