जिरेगाव खुनाचे गूढ उलगडले.. आरोपी काही तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणची कारवाई

दि २९/१/२०२३ रोजी दौड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिरेगाव येथे जिरेगाव बारामती रोड लगत एक २५ ते ३० वर्ष वय असलेले पुरुष जातीचे प्रेत खून करून टाकून देण्यात आले होते.

सदर मयत इसमाची अवघ्या थोडया वेळातच ओळख पटवून त्याचा खून का झाला असावा किंवा कोणी केला असावा हे शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार दौड पोलीसस्टेशन येथे अज्ञात एसमाविरुद्ध ६४/२०२३ भा द वी ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या काही वेळातच मिळालेली मयत इसम प्रफुल्ल उर्फ मोनू राजेंद्र बारावकर (वय २६ वर्षे रा खंडोबा नगर बारामती , बारामती जि पुणे) याची असल्याचे समजले. त्याचे मित्र आणि नातेवाईक यांचेकडे त्याचेबद्दल माहिती घेतली असता माहिती मिळाली की मयत प्रफुल्ल हा त्याचे ३ मित्र यांचे सोबत दारू पिण्यासाठी कुरकुंभ येथील एका हॉटेल मध्ये बसला होता. सदरील मित्रांची माहिती घेतली असता यात १) किशोर उर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे (वय २३ वर्षे रा कुरकुंभ) २) शुभम उर्फ बाबा उद्धव कांबळे (वय २३ वर्षे रा कुरकुंभ) ३) गणुजी उर्फ आबा रमेश खंडाळे (वय २६ वर्षे रा कुरकुंभ) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच त्यांचेकडील माहिती मध्ये विसंगती आढळून आली.

सदरील ३ इसमांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता आम्ही ३ घे मिळून मयत प्रफुल्ल बारावकर याचे सोबत दारू पिऊन वाद झालेमुळे त्यास आम्ही दौड कुरकुंभ रोड घाट येथे नेऊन जीवे मारले आणि त्याला उचलून कुरकुंभ बारामती रोडवर असणारे जिरेगाव येथे रस्त्याच्या कडेला टाकून दिले असे सांगून त्यांनी केलेला खून हा कबूल केला. सदरील ३ इस्माना पुढील तपासकामी दौड पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,
पोलीस उपअधिक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पो उप निरीक्षक गणेश जगदाळे , अमित सिद पाटील, सहा पो फो तुषार पंदारे , काशिनाथ राजपुरे, पो हवा जनार्दन शेळके, पो हवा असिफ शेख, पो हवा राजू मोमीन, पो ना योगेश नागरगोजे
पो कॉ अक्षय सुपे,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.