दौंड येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दौंड : अखिल भारतीय मराठा महासंघ (दौंड शहर व तालुका) तसेच शिवाई देवी मंदिर ट्रस्ट शिवराजनगर, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ विरंगुळा केंद्र सरपंच वस्ती येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दौंड-गोपाळवाडी रोड वरील राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून सरपंच वस्ती पर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली, या यात्रेत अनेक लहान मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. यावेळी लाठीकाठी खेळ तसेच जिजाऊ यांच्या जीवनावरील वरील नाटिका सादर करण्यात आली. लर्न अँड प्ले स्कूल तसेच संस्कार स्कूल चे विद्यार्थी या मध्ये सहभागी झाले होते.
राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीयांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजय कावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, दत्तात्रय (बुवा) सावंत ,दादासाहेब नांदखिले, व्याख्याते राहुल शिंदे, जयंत पवार , प्रविण होले सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .अरुणा मोरे होत्या, प्रास्ताविक सविता भोर यांनी केले तर सुत्रसंचालन स्वाती मोटे व सुषमा दरेकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. नगरसेवक जिवराजबापू पवार ,आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, विक्रमबाबा पवार, शैलेंद्र पवार, गणेश काकडे, महेश दरेकर ,रोहन घोरपडे ,सज्जन काकडे यांनी परिश्रम घेतले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समानार्थी-
१) पुष्पा प्रकाश पवार (देऊळगाव राजे)
२)रेश्माताई परमेश्वर गायकवाड(हिंगणी बेर्डी)
३) शबनम समीर डफेदार (चौफुला)
४) बेबी आप्पासो गुंड (नानगाव)
५) प्रमिला शिवाजी होले (बेटवाडी)
६) प्रियदर्शनी सखाराम हंडाळ (केडगाव)
७) साक्षी शामराव शेळके (मलठन)
८) शोभा रमेश घारे (नानवीज)
९) शिलाताई अंबादास वाघमारे(लिंगाळी दौंड).