Categories: क्राईम

दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर हायवेवर असणाऱ्या हॉटेलसमोरुन 6 लाख 82 रुपयांच्या दागिन्यांची ‘चोरी’

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गवर दौंड तालुका हद्दीत असणाऱ्या हॉटेल शौर्यवाडाच्या पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाची काच फोडून सुमारे 6 लाख 82 हजार 500 रुपयांचे सोने – चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सुशील शरणआप्पा होसमणी (रा. आदित्य मल्हार सोसायटी शिंदे वस्ती, रावेत,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान
खडकी (ता.दौंड) गावच्या हद्दीतील पुणे सोलापुर हायवे रोडलगत असलेल्या शौर्यवाडा हॉटेलचे पार्किंगमध्ये फिर्यादी सुशील होसमणी यांनी त्यांची फोरव्हीलर गाडी पार्क केली होती. काही वेळाने ते गाडीजवळ गेले असता कुणीतरी त्या गाडीची काच तोडुन गाडीमधुन 6 लाख 82 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते.

हा प्रकार पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात कायमच घडत असून या अगोदर अश्या चोऱ्या करणाऱ्या टोळ्या यवत, दौंड पोलिसांनी पकडलेल्या आहेत. त्यामुळे आतापोलिसांना या टोळीला पकडण्यात कधीपर्यंत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago