Categories: Previos News

बाबो.. चक्क ‛JCB’ च्या सहाय्याने घर पाडून 70 हजारांची चोरी! पुणे जिल्ह्यातील विचित्र घटना



| सहकारनामा |

वेल्हा : आपण दररोज बातम्यांमधून आणि विविध माध्यमांतून चोरट्यांनी चित्रविचित्र पद्धतीने चोऱ्या झाल्याचे वाचत असतो. मात्र चोरट्यांनी चक्क ‛जेसीबी’ च्या सहाय्याने 9 लाखांचे घर पाडून चोरी केल्याचे कधी आपण ऐकले आहे का, मात्र हे खरे आहे आणि हि घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मिहीर राजीव दुधाट (सध्या रा. बावधन, पुणे) यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की दि.१३/०५/२०२१ रोजी सायंकाळी ५:०० ते दि.१५/०५/२०२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने जे.सी.बी.च्या सहाय्याने त्यांच्या वेल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या घराच्या भिंती आणि घरातील संडास व बाथरुमच्या भिंती पाडुन त्यावाटे आत प्रवेश करुन त्यांच्या घरातील

जनसेट, सोलर सिस्टीम, एल.सी.डी.

टी.व्ही, ड्रील मशीन, ग्राईंडर, बार

कटर, ग्रास कटर असा एकूण 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरी केला आहे. हि चोरी करताना त्यांच्या  घराच्या भिंती, संडास, बाथरूम पाडून त्यांच्या घराचे सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. 

मिहीर दुधाट यांच्या फिर्यादीवरून वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हा पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago