आंबेडकर घराण्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जगदीश गायकवाड यांचा दौंडमध्ये निषेध

अख्तर काझी

दौंड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व आंबेडकरी घराण्या विषयी आक्षेपार्ह विधान (अपशब्द) वापरणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश गायकवाड यांचा दौंड वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व त्यांच्या विरोधात ईडीची चौकशी बसवावी अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.

पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यावेळी हे निवेदन स्वीकारले. वंचित बहुजन आघाडी, दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी आपल्या भाषणातून जगदीश गायकवाड यांनी आंबेडकर परिवाराविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

वंचितचे ता. सचिव अजिंक्य गायकवाड, शहर संघटक राहुल नायडू, शहर संघटक बबलू जगताप, शहर कार्याध्यक्ष शिवा खरारे, भीमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, उपाध्यक्ष रितेश सोनवणे, संघटक सुमित सोनवणे, सा.मा.प्रवीण भालेराव, सा.मा.आनंद रणधीर, करण खांडे, निलेश मिसाळ, सुमित शिंदे, गौरव शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.