पुणे : सहकारनामा ऑनलाइन
दिनांक ३१/१०/२०२० रोजी दुबई येथे सुरू असलेल्या बेंगलोर व हैद्राबाद यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी या सामन्यावर शिरूर सी.टी. बोरा कॉलेज शेजारील मैदानात इसम १) सुरज अभय गुगळे (रा.शिरूर वाडा कॉलणी ता.शिरूर जि.पुणे) २) अदित्य दिलीप ठाकुर (वय २५ वर्षे रा.अदीनाथनगर शिरूर ता.शिरूर जि.पुणे) यांनी स्वत:चे अर्थिक फायद्यासाठी मोबाईल फोन तंत्राचा क्रिकेट बेटींग जुगार करीता गैरवापर केला व क्रिकेट मॅचच्या हार जीतवर मोबाईलव्दारे सट्टा लावताना व घेताना आरोपी नं.२ मिळुन आला.
मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी नं.१ हा पळुन गेला. यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपीने त्यांचे बेटींग मुख्य बुकी ३) प्रकाश जोशी रा.अहमदनगर (पुर्ण नांव पत्ता माहीत नाही) याचे मोबाईल नंबरवर लावत असल्याचे सांगीतले. त्यामुळे या तीन इसमांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळून आलेल्या आरोपीकडून २ मोबाइल व रोख रक्कम १,५००/- रु. असा एकूण कि.रू. ३१,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई, मा.डॉ. अभिनव देशमुख सो.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण.
मा. श्री मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक सो बारामती, उपविभागीय अधिकारी श्री. राहूल धस सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि पृथ्वीराज ताटे
पोसई/अमोल गोरे, सफौ/ दत्तात्रय गिरमकर, पोहवा राजेंद्र पुणेकर, पोहवा महेश गायकवाड, पोहवा निलेश कदम
पोना जनार्दन शेळके, पोना राजू मोमीन, पोशि अक्षय जावळे, पोशि दगडू विरकर यांनी केलेली आहे.