| सहकारनामा |
नवी दिल्ली : आयपीएल (IPL) म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग हि क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेली असून हि स्पर्धा रद्द करण्याचे खरे कारण आता समोर आले आहे.
हि स्पर्धा सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्याने अनेक स्तरांमधून या स्पर्धेवर टीका सुरू होती मात्र सर्व खबरदारी घेऊन हि स्पर्धा सुरू असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात होते.
मात्र सोमवारी कोलकाता संघाच्या काही खेळाडूंना करोनाची लागण झाली आणि त्यामुळे सोमवारी होणारा कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना रद्द करून पुढे ढकलावा लागला.
त्यातच मंगळवारी पुन्हा चेन्नईच्या संघासोबत असणाऱ्या स्टाफमधील काहीजण करोना पॉझिटिव्ह आले आणि सर्वांच्याच चिंता वाढल्या मात्र खेळाडू आणि त्यांच्यासोब असणाऱ्या सपोर्ट स्टाफच्या आरोग्याचा विचार करून आयपीएल स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.