Categories: Previos News

International : US F-16 Aircraft Crashes – यूएस एअरफोर्सचे F -16 विमान अपघातग्रस्त, पायलट आश्चर्यकारकरित्या बचावला



नवी दिल्ली : अमेरिकेच्या हवाई दलाचे F -16 हे लढाऊ विमान न्यू मेक्सिको जवळ क्रॅश झाले. या अपघातात विमानाच्या पायलटने वेळीच खबरदारी घेतल्याने तो बचावला आहे. न्यू मेक्सिकोच्या  होलमन एअर फोर्स बेसजवळ हा अपघात झाला.  

अमेरिकन मीडियाच्या म्हणण्यानुसार मे पासून येथे असे पाच अपघात झाले आहेत. तर गेल्या दोन आठवड्यात येथे दोन F -16 विमान क्रॅश झाले आहेत. यापूर्वीही 1 जुलै रोजी विमान अपघातात पायलट ठार झाला होता.

Us F-16 Air Craft Crash

हॉलमन बेसने जारी केलेल्या निवेदनानुसार  49 वा विंगला नियुक्त केलेल्या अमेरिकन हवाई दलाचे F -16 C वाइपर येथे कोसळले. ही घटना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता घडली. बेसच्या माहितीनुसार पायलटने योग्य वेळी स्वत: ला बाहेर झोकून दिल्याने तो बचावला. मात्र त्याला किरकोळ दुखावत झाली.  अलिकडच्या काळात अशा बर्‍याच घटना घडल्या असून त्यासाठी चौकशी समिती नेमली गेली आहे. जी संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे.

F -16 हे अमेरिकन हवाई दलाचे महत्त्वाचे लढाऊ विमान असून यूएस एअरफोर्समध्ये याची संख्या मोठी आहे. अमेरिका हे विमान मोठ्या संख्येने इतर देशांना विकत असते.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago