दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असून शिक्षकाच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ भानुदास काळे (उपशिक्षक, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कानगाव ता.दौंड, पुणे ) यांनी फिर्याद दिली की
आरोपी संतोष उद्धव महाडिक रा.कानगाव ता.दौंड, पुणे) यांनी फिर्यादी हे त्यांच्या शाळेचे स्टाफरूममध्ये शालेय कामकाज करीत असताना नमुद आरोपी हे स्टाफरूममध्ये आले आणी त्यांनी फिर्यादी यांचे सहकारी शिक्षक शशीकांत शिवाजी शिंदे यांना ऐकरी भाषेत तु माझे मुलाचा निकाल कधी देणार आहेस असे म्हणाले त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना म्हणाले की दोन दिवसामध्ये निकाल तयार होणार आहे. तुम्ही शिक्षकांशी व्यवस्थीत बोला तुमची काय अडचन आहे ती बसुन सांगा असे म्हणाले असता संतोष उध्दव महाडीक यांनी फिर्यादी यांना तु मध्ये बोलनारा कोण, तुम्ही येथे कसे काम करता तेच बघतो असे म्हणुन फिर्यादी यांच्या अंगावर मारायला धावून जात शिवीगाळ केली आणि तेथे असलेली प्लॉस्टीकची खुर्ची उचलुन फिर्यादी यांना मारायला घेतली.
यावेळी फिर्यादी हे काम करीत असलेली शाळेची कागदपत्र त्यांच्या हातातुन घेवुन खाली फेकुन देवुन ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. अशी फिर्याद येथील शिक्षकांनी दिल्याने संतोष महाडिक यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वाबळे हे करीत आहेत.