Inspiring : स्वामी चिंचोलीच्या माजी सरपंचाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत जेसीबी मशीन, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्याचा शुभारंभ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध, भराव पाण्यामुळे वाहून गेले असून हे बांध आणि भराव पुन्हा भरून घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे.

शेतकऱ्यांची ही अडचण समजून घेत आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक आणि स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अझहर शेख यांनी आपले जेसीबी मशीन या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत दिले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लाखो रुपये यातून वाचणार आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते काल स्वामी चिंचोली येथे नारळ फोडून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अझहर शेख यांनी बोलताना आपण आमदार राहुल कुल यांचे कार्य जवळून पाहिले आहे, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही सामाजिक कार्यात झोकून देण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे मीही शेतकरी बांधवांसाठी आपले जेसीबी मशीन मोफत देऊन त्यांच्या अडचणीच्या काळात थोडासा हातभार लावत असल्याचे सांगितले.