Inspiring story : दौंडच्या कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीला सरसावले डॉक्टर दाम्पत्य



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरातील कोरोना महामारी संपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीला आता शहरातील डॉक्टर सिद्धार्थ व डॉक्टर क्षितिजा कुलकर्णी हे दांपत्य पुढे सरसावले आहेत. यांचा योगेश्वरी हा खाजगी दवाखाना प्रशासनाने अधिगृहीत  केला आहे. ज्या रात्री प्रशासनाने त्यांना याबाबत सूचना केली त्या रात्री पासूनच त्यांनी सूचनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

डॉ. सिद्धार्थ यांची भेट घेऊन याबाबतची अधिक माहिती  घेतली असता डॉ. सिद्धार्थ म्हणाले की, आज पर्यंत सुमारे २५ रुग्ण योगेश्वरी मध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. बहुतेक रुग्ण गंभीर रित्या आजारी असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयातून ते पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी काही रुग्णांना व्हेंटिलेटर ची सुविधा दिल्याने ते बरे होऊन घरी  परतले आहेत, काही नवीन रुग्ण व्हेंटिलेटर वर उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांवर मी माझी डॉ. पत्नी व दवाखान्यातील सर्व कोविड टीम ने उपचार केलेले आहेत.

कोरोना रुग्णाचा उपचार करणे सोपी गोष्ट नाही, यासाठी मोठी टीम लागते, या सर्वांना PPE किट घालून काम करावे लागते अशाप्रकारे जास्त वेळ काम करणे शक्य होत नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. या उपचारासाठी जास्तीचा स्टाफ कार्यरत ठेवावा लागतो आहे. बाधित रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच घरी येऊ न देणे, सोसायटीमध्ये येण्यास आडकाठी करणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही कर्मचाऱ्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती असल्याने ते घरी जाऊ शकत नाही, अशांची राहण्याची, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी योगेश्वरी ने घेतली आहे. प्रशासनाकडून,सामाजिक संस्थांकडून अद्याप मदत मिळालेली नाही परंतु त्याबाबत बोलली चालू आहे. दवाखान्याला स्वयंसेवकांची आवश्यकता आहे असेही डॉ. सिद्धार्थ म्हणाले.

रुग्णांना दवाखान्यात जागा उपलब्ध नसणे, व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे, उपचारासाठी लागणारी औषधे, त्यांचा होणारा काळाबाजार असे अनेक  प्रश्न भेडसावत आहे. बधितांचा उपचार खर्चिक आहे, कोणतीही इन्शुरन्स कंपनी, सरकारी योजना पूर्ण खर्च उचलत नाही, जाहिराती आणि घोषणा मात्र केल्या जात आहेत. काही ठिकाणी ८०% जागा कोविड साठी आरक्षित केल्या आहेत याचा अर्थ त्या मोफत आहेत असा नाही असे स्पष्टपणे सांगितले जात नाही. दवाखान्यातील पाणीपुरवठा,वारंवार वीज जाणे, कचरा वेळेवर उचलला न जाणे या गोष्टींचा दवाखान्यांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त त्रास आहे.

अशा सर्व अडचणींचा, दबवांचा सामना करीत उत्तम रुग्णसेवा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, पुढील काही महिने सर्वांसाठी खडतर असणार आहे तरी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही  करतो आहोत त्याला दौंड करांची सुद्धा साथ लागणार आहे आणि  म्हणूनच आपला  कोविड वरील विजय निश्चित आहे असेही  शेवटी डॉक्टर सिद्धार्थ कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

11 मि. ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

2 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

9 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago