Categories: Previos News

Inspiring – नोकरीच्या मागे न धावता श्रमाच्या जोरावर ‛हवेली’चा युवक बनला यशस्वी उद्योजक



हवेली : सहकारनामा ऑनलाइन

उरुळी कांचन  येथील रहिवासी श्री. दत्तात्रय शिवाजी मेमाणे यांनी अपार कष्ट व मनाशी बाळगलेली जिद्द याच्या जोरावर रोपवाटिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कृषि महाविद्यालय,पुणे येथील कृषिदूत ऋषिकेश रामचंद्र चौधरी यांनी श्री. दत्तात्रय मेमाणे यांच्या रोपवटीकेला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची यशोगाथा जाणून घेतली.

सन २०१४ मध्ये त्यांनी भागीदारीत ६.५ एकर क्षेत्रफळात ग्रीनलाईफ बायोटेक प्रा. लि. या रोपवाटीकेची उरुळी कांचन येथे उभारणी केली. पंचक्रोशित रोपवाटिकेंची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील इतर रोपवाटिकेंपेक्षा त्यांनी आपल्या रोपवाटिकेचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

त्यांच्या रोपवाटिकेत टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कोबी, पपई, शेवगा, ऊस यांच्या विविध जातींची दर्जेदार रोपे तयार केली जातात. लेटयूस, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, रोझमेरी यांसारखी विदेशी रोपे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील कलकत्ता झेंडू (स्टंप) ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शोभिवंत फुलांमध्ये जरबेरा, शेवंती, डायन्थस, अशा विविध प्रकारच्या फुलांची दर्जेदार रोपे तयार केली जातात. उत्कृष्ट दर्जाची रोपे व उत्तम सेवा आणि प्रामाणिकपणा हेच त्यांच्या यशाचे सूत्र आहे.

शेतकऱ्यांना रोपे माफक दरात आणि योग्य वेळेत उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यांच्या रोपांना पंचक्रोशितूनच नव्हे महाराष्ट्रातील व देशातील विविध कानाकोपऱ्यातून त्यांच्या रोपांना मागणी असते. त्यामुळे आपसूकच शेतकऱ्याचा कल त्यांच्या रोपवटीकेकडे  वाढला आहे. कामगारांपती असलेल्या आपुलकीमुळे सुरुवातीपासून जोडलेले कामगार आजतागायत त्यांच्याकडे काम करत आहेत. त्यांच्याकडे १५ पुरुष व ३० महिला कामगार काम करत असून जवळजवळ ५० कुटुंबाचा उदरनिर्वाह या रोपवाटीका उद्योगामुळे होत आहे. 

तसेच रोपांच्या वाहतुकीसाठी त्यांनी भाडेतत्त्वावर गाड्या उपलब्ध केल्या आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या कंपन्यांशी सहयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. कामाप्रती असलेली तत्परता व कठोर परिश्रमामुळे या उद्योगातून त्यांची मोठ्या प्रमाणात वार्षिक आर्थिक उलाढाल होत आहे. शेवटी त्यांनी नवयुवकांना या क्षेत्रात येण्याचा व कामगार न बनता स्वतः यशस्वी उद्योजक बनण्याचा संदेश दिला.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

16 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago