पाटस (दौंड) : दौंड तालुक्यातील पाटस येथे महिला सरपंचांना जखमी करून त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पतीच्या अंगावर टेम्पो घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस च्या महिला सरपंच तृप्ती दादा भंडलकर यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून राजेश पांडुरंग लाड (रा.पाटस, दौंड) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री ०८:१५ वाजता पाटस येथील अंबिकानगर येथे आरोपी याने सिमेंट रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरजवळ येवुन टँकरवरील चालक अदिनाथ यादव यास रस्त्यावर पाणी मारू नका असे म्हणाला, त्यावेळी फिर्यादी सरपंच यांनी मी रस्त्यावर पाणी मारते मला पाईप द्या असे म्हणुन फिर्यादीने आदिनाथ याच्या हातातुन पाण्याचा पाईप घेवुन स्वतः पाणी मारायला लागले असता यातील आरोपी राजेश लाड याने फिर्यादीच्या हातातुन पाण्याचा पाईप हिसकावुन घेवुन तुला सांगितलेले समजत नाही का? असे म्हणुन फिर्यादीला जोरात ढकलुन खाली रोडवर पाडून जखमी केले असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
तसेच यावेळी फिर्यादीची सासु अंजना यांनी तु माझी सुन तृप्ती हिस का धक्का दिला असे आरोपीस विचारले असता त्यावेळी फिर्यादीची सासु अंजना यांनाही आरोपीने हाताने जोरात धक्का देवुन खाली पाडले. हा प्रकार पाहून समाज मंदीराचे समोर बसलेले धनंजय पोपट भंडलकर, संतोश विठ्ठल शितकल, अमोल अनिल सुतार, राजेंद्र रामदास घाडगे असे नागरिक येथे आले व भांडण करू नका असे आरोपीला समजावुन सांगत असताना आरोपीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपी याने तो टेंम्पो चालु करून फिर्यादीच्या पतीच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असताना त्यांच्या अंगावर टेम्पो घातला तेव्हा टेंम्पोचा समोरून धक्का बसल्याने फिर्यादीचे पती बाजुस रस्त्यावर टाकलेल्या मुरूमावर पडले तेंव्हा त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला जखम झाली. यानंतर नागरिकांनी हा टेम्पो अडवल्याने आरोपी टेम्पो तेथेच सोडून निघून गेला असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
घटनेचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.