Categories: Previos News

Indian Army – अण गावकऱ्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला, कोऱ्हाळे (बारामती) येथील जवान जम्मू-काश्मीरमध्ये धारातीर्थी

बारामती – सहकारनामा

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील देश सेवेत असणारे जवान बिंटू राजाराम सुळ यांना जम्मू-काश्मीर येथे 29 डिसेंबर रोजी कर्तव्यावर असताना धारातीर्थी पडले. 

भारतीय जवान बिंटु सूळ यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

काल शनिवारी बिंटू सुळ यांचे पार्थिव बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे येताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

या वेळी कोऱ्हाळे गावातील वातावरण अत्यंत शोकाकुल बनले होते. उपस्थित नागरिकांनी यावेळी भारत माता की जय, जवान बिंटु सूळ अमर रहे अशा घोषणा दिल्या.

बिंटू सुळ यांची सैन्यदलातील सेवा पूर्ण झाली होती मात्र त्यांनी देशसेवेसाठी पुन्हा आपला कार्यकाळ वाढवून घेतला होता.

बिंटू सुळ यांचे पार्थिव गावात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला हे पाहताच गावकऱ्यांनाही आपले अश्रू अनावर होऊन त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago