पुणे : काँग्रेससह विरोधी पक्षांची एकी होऊन त्यांनी त्याला इंडिया (INDIA) गटबंधन असे नाव दिल्यानंतर भाजपकडून त्यावर तिखट प्रतिक्रिया आली होती. आता आपल्या देशाच्या राष्ट्रपतींच्या नावाने जी-२० ( G-20) परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या आमंत्रणात प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे तर प्रेसिडेन्ट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. या उल्लेखामुळे आता मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले असून यामध्ये आता काँग्रेस पार्टीने मोदींवर निशाणा साधला आहे.
या सर्व आरोप प्रत्यारोपात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही यात उडी घेत आपले मत मांडले आहे. तर तिकडे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही एक ट्वीट केल्यामुळे त्यांच्या मताबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. इंडिया की भारत यावर काँग्रेसकडूनही तिखट प्रतिक्रिया आली असून त्यांनी आपल्या ट्वीटर हॅन्डलवर
G-20 सम्मेलन के लिए राष्ट्रपति द्वारा मेहमानों को भेजे गए आमंत्रण पत्र में रिपब्लिक ऑफ ‘इंडिया’ की जगह रिपब्लिक ऑफ ‘भारत’ शब्द का इस्तेमाल किया गया है।
INDIA से इतना डर?
यह विपक्ष के लिए मोदी सरकार की नफरत है या एक डरे और सहमे हुए तानाशाह की सनक?
असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
तर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने ‘तुमचा ऊर अभिमानाने भरून यावा अशाच नावाचं मी समर्थन करेनं. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलं आहे. त्यामुळे भारत हे नाव लागू केलं पाहीजे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की जर्सीवर भारत हे नाव असावं’, असं ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केलं आहे.
तसेच पुढे त्याने, ‘१९९६ साली नेदरलँड संघ भारतात हॉलंड या नावाने वर्ल्डकप खेळण्यासाठी आला होता. २००३ मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा त्यांचं नाव नेदरलँड झालं होतं. आताही तेच लागू आहे. बर्मा हे नाव ब्रिटीशांनी दिलं होतं आता त्याचं नाव म्यानमार आहे. अशीच अनेक मूळ नावे समोर येत आहेत,’ असे ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केलं आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही
वरील प्रमाणे ट्वीट केलं असून त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.