देश-विदेश : आज भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील अतिरेकी अड्यांवर मिसाईल हल्ले करून तेथील सुमारे नऊ ठिकाणे उध्वस्त केली आहेत. हे हल्ले रात्री १ वाजून २० मिनिटांनी हे हल्ले करण्यात आले आहेत. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. याबाबत पाकिस्तानचा कांगावा सुरूच असून भारताकडून पाक व्याप्त काश्मीर मधील नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
२२ एप्रिल ला अतिरेक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने जोरदार तयारी केली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी मध्यरात्री 7 मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.
ऑपरेशन सिंदूर’ चे यश : भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले असून ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. भारताकडून पाकिस्तानात करण्यात आलेल्या कारवाईचे सर्व स्तरांमधून स्वागत करण्यात येत आहे.